• संपर्क साधा
  • दिनदर्शिका
  •  
  • EN  |  MR
EN  |  MR
  • संपर्क साधा
  • दिनदर्शिका
  डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय
  • मुख्यपृष्ठ
  • संग्रहालयाबद्दल
    • उद्द्येश्य
    • संग्रहालयाची गोष्ट
    • संग्रहालय विश्वास समिती
    • संचालकांची टिपणी
    • संग्रहालयाचे पुनरुत्थान
  • भेट द्या
    • दिशानिर्देश
    • वेळ आणि तिकीट दर
    • येथे येण्यासाठी सुलभ साधने
    • संग्रहालयाचा माहितीदौरा
    • ध्वनी/श्राव्य मार्गदर्शक
    • विक्री केंद्र
    • उपहार गृह
    • संग्रहालयाचे धोरण
  • प्रदर्शने
    • चालू प्रदर्शने
    • गतकालीन प्रदर्शने
    • आगामी प्रदर्शने
  • संग्रह
    • संग्रहाची कथा
  • शिक्षण
    • शाळा व स्वयंसेवी संस्था
  • अन्वेषण
    • उपक्रम आणि कार्यक्रम

संग्रहाची

संग्रहाची कथा

  • मुंबईचा इतिहास
  • व्यापार व सांस्कृतिक देवाण-घेवाण
  • पूर्व आधुनिक काळ
  • आधुनिक आणि समकालीन
  • संग्रहालयाला भेट
मोफत अभ्यास दौरे

प्रत्येक आठवडाअखेरीस संग्रहालयाच्या
अभिरक्षकांकडून संग्रहालयाची माहिती मिळवा

शनिवार
सकाळी ११.३० वा इंग्रजीतून
दुपारी १२.३० वा मराठी/हिंदी भाषेतून
सर्वांसाठी खुले.

मुंबईचा इतिहास


संग्रहातील मातीचे लघु देखावे, कथानकं दर्शवणारे देखावे, नकाशे, लिथोग्राफ्स (पाषाणातील छापील चित्रे), छायाचित्रें आणि दुर्मिळ पुस्तकं हे मुंबईवासीयांचे जीवनांचे उत्कृष्ट दर्शन घडवतात आणि अठराव्या शतकाच्या पूर्वार्धापासून ते विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंतच्या शहराच्या इतिहासाचे दस्तऐवजीकरण करतात. s.

सन १९००च्या सुरुवातीच्या दशकांमध्ये कलाप्रबंधकांनी संग्रहालयाची कल्पना मुंबई शहर व आसपासच्या परिसराच्या इतिहासाचा चित्रमय चिरस्थायी संचय आणि पुरातन वस्तूंचे संग्रह व प्रदर्शन केंद्र म्हणून केली होती. मुंबई च्या बेटांचे नकाशे, आराखडे, छापे आणि छायाचित्रांच्या प्रतिकृतींचा संग्रह मिळवण्यात आला. हा संग्रह सर्वांकरिता १९१८ साली खुला करण्यात आला. १६०० ते १९०० सालांमधील संचयातून निर्माण झालेला हा संग्रह एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत ह्या शहराची सात बेटांपासून एका प्रभावी नागरिक केंद्रात झालेल्या स्थापत्यशास्त्रीय उत्क्रांतीच्या इतिहासाची नोंद दर्शवतो. हा संग्रह आक्रमणं, आर्थिक विकास आणि शहरी नियोजनातून झालेल्या भौगोलिक उत्क्रांतीचे इतिवृत्त देतो. १७व्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते २०व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंतचा मुंबईचा विकास चित्रित करणारे नकाशे ह्या संग्रहात समाविष्ट होतात.

संग्रहामध्ये शहरातील बंदरांवरच्या अगदी सुरुवातीच्या होड्या, वरळीतील पहिल्या कापडाच्या गिरण्यांच्या प्रतिकृती आणि ब्रिटिश किल्ल्याच्या आतमध्ये असलेला मुंबईचा चिरेबंदी वाडा, प्रशासकीय मुख्यालय ह्या देखाव्यांचा समावेश होतो.

संग्रहालयातील ग्लास निगेटिव्हज् चा संचय एकोणिसाव्या शतकातील मुंबईची दृकचित्र नोंद सादर करतात. ह्या संग्रहामध्ये १५०० हुन अधिक ग्लास निगेटिव्हज् आहेत ज्या शहराचे विविध पैलू जसे वास्तुकला, जुन्या शहरातील दृश्यं आणि प्रमुख नागरिकांचे दस्तऐवजीकरण करतात.


हेप्टानेशिया
(ईसवी सन १२९४-१६६२)
उत्थित नकाशा
कोळ्यांचे जोडपे, मुंबईतील लोकसमूह
१९०९-१९१२
रंगविलेली अर्धी भाजलेली टेराकोटा माती
होडीची प्रतिकृती
लाकूड
सूती कापड आणि सूती धागा
मुंबई व प्रदेशाचा पेशव्यांसाठी बनवलेला नकाशा
साधारण १७७०च्या दरम्यान मुंबईमध्ये पेशव्यांच्या प्रतिनिधी द्वारे घडवलेला नकाशा कागदावर जलरंगाची छापील प्रत, १९०९-१९१२

मुंबई
सन १८६०
हाताने रंगविलेले कोरीव काम
ग्रोसचा बॉम्बेचा आराखडा
१७५०
कागदावर जलरंगाची छापील प्रत, १९०९-१९१२
मुंबईतील लोकसमूह
१९३०
टेराकोटा माती
मुंबईमध्ये इंग्रज बाजारपेठेकरिता कापसाचे वजन करताना
१८६२
कोरीव काम

शहर सभागृह, मुंबई
१८९३
कोरीव काम
गाळउपसणी यंत्र 'कुफूस' ची प्रतिकृती
१९१४
लाकूड आणि धातू

कप्तान थॉमस डिकिन्सन ह्यांनी काढलेले बॉम्बेचे बेट
१८१६-१८९०
कागदावर जलरंगाची छापील प्रत, १९०९-१९१२
जुन्या मुंबई मधील रस्त्यावरचे दृश्य
एकोणिसावे शतक
जलरंगातील चित्राचा शिळाछाप

विकासानंतर वरळी परिसराची प्रतिमा
१९४०
उत्थित नकाशा
पारसी जोडपे, मुंबईतील लोकसमूह
१९०९-१९१२
रंगविलेली अर्धी भाजलेली टेराकोटा माती



बघदादचे यहूदी जोडपे, मुंबईतील लोकसमूह
१९०९-१९१२
रंगविलेली अर्धी भाजलेली टेराकोटा माती

बेलासिस रस्त्यावरील चाळ
चित्र-शिल्प देखावा

फ्लोरा फाऊंटन (कारंजे)
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत
काचेचा विरोधी ठसा (ग्लास निगेटिव्हज्)
एलिफन्टाचा हत्ती
इसवी सनाचे पाचवे शतक
पाषाण
धोबी जोडपे, मुंबईतील लोकसमूह
१९०९-१९१२
रंगविलेली अर्धी भाजलेली टेराकोटा माती
सुरती बोहऱ्यांचे जोडपे, मुंबईतील लोकसमूह
१९०९-१९१२
रंगविलेली अर्धी भाजलेली टेराकोटा माती

More at BDL

Cafe

NewsLetter

Careers

Shop

Tours

Flims

Festive Fun

Exhibition

Collection

Music & Theater

Workshops

Public Lectures

Touch
Touch
Touch
Touch

डॉ. भाऊ दाजी लाड मुंबई
शहर संग्रहालय समाजाच्या सेवेकरिता एक अशी संस्था म्हणून काम करण्याचे उद्देश्य ठेवते जी उत्कृष्ट प्रदर्शनांद्वारे आणि विविध दृक व वैचारिक माध्यमांतून सांस्कृतिक ज्ञानाच्या प्रसाराकरिता समर्पित असेल.

mcgm
                           website Bajaj
                           foundation
                           website intach
                           website
mcgm
                           website Bajaj
                           foundation
                           website intach
                           website

बृहन्मुंबई महानगरपालिकेची संस्था
जमनालाल बजाज प्रतिष्ठानाच्या सहकार्याने कार्यरत
इन्टॅक, इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज द्वारे पुनरुज्जीवीत

पत्ता
वीर माता जिजाबाई भोसले उद्यान (राणीची बाग),
९१/अ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग,
भायखळा पूर्व, मुंबई ४०००२७, महाराष्ट्र, भारत

वेळ:
तात्पुरते बंद

दू. : +९१ २२ २३७४१२३४

 
डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय - मुख्यपृष्ठ - © कॉप्य्रिघात २०१४