फ्लोरा फाऊंटन (कारंजे)  
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत
काचेचा विरोधी ठसा (ग्लास निगेटिव्हज्)

फ्लोरा फाऊंटनची प्रतिमा संग्रहालयाच्या काचेच्या विरोधी ठस्यांच्या संग्रहाचा भाग आहे. जेम्स फोरसिथने परदेशातून मागवलेल्या पोर्टलॅंड दगडातून कोरलेले फ्लोरा फाऊंटनचे १८६९ साली अनावरण झाले. हे शिल्प सर बार्टले फ्रेरे, जे १८६२ ते १८६७ ह्या काळात मुंबई चे राज्यपाल होते, यांना समर्पित केले गेले. पूर्वीच्या मुंबई किल्ल्याच्या तीन पैकी एका प्रवेशद्वारासमोर हे उभारले गेले होते. ह्या कारंज्याचे नाव समृद्धीची रोमन देवता, फ्लोरा, हिच्या नावाने दिलेले असून वर तिचीच प्रतिमा बघावयास मिळते.