शहर सभागृह, मुंबई  
१८९३  
कोरीव काम

१८३० साली पूर्ण झालेली शहर सभागृहाची ही कोरीव कलाकृती फिर्थ आणि सहकाऱ्यांच्या छायाचित्रावरून केलेली आहे. रिगेट, सरे येथे स्थापन झालेली ही कंपनी छायाचित्रांचे पोस्टकार्डस् बनविण्याकरिता नावाजलेली होती. वास्तुकलेतील नवअभिजातवादीय शैलीत बांधण्यात आलेले हे शहर सभागृह मुंबई किल्ल्याच्या मध्यभागी उभारले गेले. आज ते मुंबईतील एशियाटिक सोसायटी म्हणून ओळखले जाते आणि भारतातील सर्वांत मोठ्या ग्रंथालयांपैकी एक मानले जाते.