धोबी जोडपे, मुंबईतील लोकसमूह  
१९०९-१९१२  
Hरंगविलेली अर्धी भाजलेली टेराकोटा माती

सदर प्रतिमा कपडे धुणारा धोबी आणि त्याच्या पत्नीची आहे, ज्यांच्या पाठीवर कपड्यांची गाठोडी बांधलेली दाखवण्यात आली आहेत. आजतागायत शहरात असे धोबी सहज आढळतात.

एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धापासून ते विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत मुंबई शहरातील माणसं, त्यांची जीवनशैली आणि संस्कृती यांचं दर्शन कमलनयन बजाज मुंबई दालनातील मातीच्या प्रतिमांचा संचय घडवतो. ह्या प्रतिमा त्या काळातील कला ऐतिहासिक बदल आणि नवीन कला प्रकारांच्या निर्मितीसाठी केलेले नाविन्यपूर्ण उपक्रम चित्रित करतात..