बेलासिस रस्त्यावरील चाळ
चित्र-शिल्प देखावा

मुंबई सेंट्रल येथे स्थित बेलासिस रस्त्यावरील चाळींचा हा चित्र-शिल्प देखावा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थावर मिळकत व भूभाग व्यवस्थापकांनी १९५४ साली संग्रहालयाला उधार दिला.

मुंबई मध्ये झालेल्या कपाशी व कापड गिरणी उद्योगाच्या विकासाने शहराअंतर्गत स्थलांतराला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळालं. येणाऱ्या कामगारांना परवडणारी घरे बांधण्याची आता गरज भासू लागली आणि शहरात वेगवेगळी ठिकाणं निवासी परिसर म्हणून विकसित करण्याकरिता निश्चित केली गेली. ह्या स्थलांतरितांसाठी सार्वजनिक सुविधा आणि सामायिक ओसऱ्या असलेल्या, 'चाळ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, छोट्या इमारती बांधण्यात आल्या.