मुंबई व प्रदेशाचा पेशव्यांसाठी बनवलेला नकाशा
साधारण १७७०च्या दरम्यान मुंबईमध्ये पेशव्यांच्या प्रतिनिधी द्वारे घडवलेला नकाशा
कागदावर जलरंगाची छापील प्रत, १९०९-१९१२

अठराव्या शतकातील सदर नकाशा माधवराव पेशवे, दक्खन चे मराठा शासक आणि पूर्वीच्या बॉम्बेतील ब्रटिशांचें प्रतिस्पर्धी, यांच्याकरिता बनवण्यात आला होता. हा नकाशा विशेषकरून त्याच्या विलक्षण दृष्टिकोनामुळे चित्तवेधक ठरतो. हा ह्या प्रदेशाचा अचूक आढावा घेण्यासाठी बनवलेला नसून, याच्यात महत्वाची माहिती प्रतिकांच्या माध्यमांनी चित्रांतून दर्शवली आहे. मुंबई (बॉम्बे) आणि इथल्या बंदरांचे हे चित्रण बहूतकरून हे बेट काबूत करण्यासाठी मराठ्यांनी आखलेली रणनीती दर्शवते.