मुंबईमध्ये इंग्रज बाजारपेठेकरिता कापसाचे वजन करताना
१८६२
कोरीव काम

इंग्लंडला निर्यात करण्यासाठी मुंबईत कापूस वजन करून निर्यातीसाठी सज्ज करत अस्तानाचे दृश्य सदर कोरीव कलाकृतीत दाखवले आहे. अमेरिकन नागरी युद्धाच्या वर्षांमध्ये (१८६१-६५) अमेरिकेतून इंग्लंडला होणारी कपाशीची आयात निलंबित करण्यात आली होती. इंग्रज वस्त्रोद्योग त्यामुळेच त्यांच्या कपाशीच्या आयातीसाठी पश्चिम भारताकडे वळला, परिणामी मुंबई कडून होणाऱ्या कापूस व्यापाराची भरभराट झाला.