एलिफन्टाचा हत्ती  
इसवी सनाचे पाचवे शतक
पाषाण

एलिफन्टा (घारापुरी) बेटाचे नाव तेथील इसवी सन पाचव्या ते सहाव्या शतकाच्या काळातल्या कोरीव लेण्यांच्या प्रवेशद्वाराशी ठेवलेल्या ह्या पाषाणाच्या हत्तीवरून ठेवण्यात आले. इंग्रजांनी इंग्लंडला पाठवण्यासाठी बेटावरून हा दगडी हत्ती हलवण्याचा प्रयत्न केला असता ह्याचे तुकडे-तुकडे झाले. हे सर्व तुकडे संग्रहालयात आणण्यात आले, इथे डॉ. जाॅर्ज बर्डवूड (संग्रहालयाचे पूर्व कलाप्रबंधक) ह्यांनी ते पुनःश्च जोडले. तेव्हापासून हा हत्ती संग्रहालयाच्या प्रवेशद्वाराजवळ विराजमान आहे.