कोळ्यांचे जोडपे, मुंबईतील लोकसमूह
१९०९-१९१२
रंगविलेली अर्धी भाजलेली टेराकोटा माती

कोळ्यांचा मासेमारी करणारा समुदाय हा मुंबईतील सात बेटांवरील मूळचा रहिवासी; इथे ह्या समुदायातील जोडपे त्यांच्या पारंपरिक वेशभूषेत दाखवले आहेत. कमलनयन बजाज मुंबई दालनातील मातीच्या प्रतिमा एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकातील मुंबईची माणसं, त्यांची जीवनशैली व संस्कृतीचे दर्शन घडवतात. ह्या प्रतिमा त्याकाळातील कला, ऐतिहासिक प्रगती आणि नवीन कलाप्रकारांच्या निर्मितीतील घटना सचित्र सादर करतात.

कोळ्यांचा पारंपरिक व्यवसाय तसाच सुरु असून कोळ्यांची गावं आजही मुंबईच्या किनारपट्टीवर टिकून आहेत. गंमत म्हणजे मुंबई ह्या नावाची उत्पत्ती कोळ्यांच्या उपासनेतली 'मुंबा' देवी आणि मराठीतील 'आई' ह्या दोन्ही शब्दांपासून झाली आहे. hi.