मुंबईतील लोकसमूह
१९३०  
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या प्रतिमा

मुंबईच्या रहिवास्यांना कमलनयन बजाज मुंबई दालनातील संग्रहात मानाचे स्थान दिलेले आहे. ह्यातील शिरेटोपाच्या तावदानात मुंबईतल्या विविध समुदायांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलींचे पारंपरिक शिरेटोप दाखवले आहेत, ह्यांचे वरून ह्या शहरातील वैविध्य आणि वैश्विकतेची अनुभूती येते.

ईस्ट इंडिया कंपनीचे मुख्यालय मुंबईत स्थापन होणे हे सोळाव्या शतकापासून मुंबई शहरात होणाऱ्या बदलांचे द्योतक ठरले. ईस्ट इंडिया कंपनीने अनेक भारतीय व भारतेतर समुदायांना मुंबईत येऊन स्थायिक होण्यास आणि व्यापार व व्यवसायाच्या विकासात सहकार्य करण्यास निमंत्रित केले. त्यांना आर्थिक संधी दिल्या गेल्या, तसेच सामाजिक आणि धार्मिक स्वातंत्र्यही देण्यात आले, याचमुळे अनेक समुदाय इथे स्थलांतरित झाले आणि त्यांनी शहराच्या विकासात हातभार लावला.