कप्तान थॉमस डिकिन्सन ह्यांनी काढलेले बॉम्बेचे बेट
१८१६-१८९०  
कागदावर जलरंगाची छापील प्रत, १९०९-१९१२

'मुंबईचे बेट' असे नाव असलेला हा नकाशा १८१६-१८९० च्या दरम्यान सरकारने समुद्र मागे सरकवून जमीन मिळवण्याच्या अनेक प्रकल्पांमधून बेटांचे वाढवलेले वस्तुमान दाखवतो. हे सर्वेक्षण १८१२ साली ईस्ट इंडिया कंपनीचे एक अभियंता, कप्तान थॉमस डिकिन्सन, ह्यांच्या देखरेखीखाली सुरु झाले.

संग्रहालयाचा मुंबईच्या ऐतिहासिक नकाशांचा संचय ह्या शहराची सात बेटांपासून एकोणिसाव्या शतकात एका प्रभावी नागरिक केंद्रात झालेली उत्क्रांती चित्रित करतो. त्याचबरोबर आक्रमणांमुळे झालेले भौगोलिक बदल, आर्थिक भरभराट आणि नियोजनाचे इतिवृत्त देतो.