पारसी जोडपे, मुंबईतील लोकसमूह
१९०९-१९१२
रंगविलेली अर्धी भाजलेली टेराकोटा माती

पारसी यजमान आणि त्यांच्या पत्नीची प्रतिमा, दहाव्या शतकात धार्मिक छळातून सुटका करुन घेत पर्शिया (इराण) येथून भारतात स्थलांतरित झालेल्या झोराष्ट्रीयन समुदायाचं दर्शन घडवतात. ईस्ट इंडिया कंपनीच्या आगमनानंतर मुंबई मध्ये स्थायिक होणारा पहिला समुदाय म्हणजे पारसी. जोरकस व्यापार आणि औद्योगिक केंद्र म्हणून विकासित होणाऱ्या शहराच्या इतिहासात पारसी समुदायाचा मोलाचा वाटा आहे.

एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धापासून ते विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत मुंबई शहरातील माणसं, त्यांची जीवनशैली आणि संस्कृती यांचं दर्शन कमलनयन बजाज मुंबई दालनातील मातीच्या प्रतिमांचा संचय घडवतो. ह्या प्रतिमा त्या काळातील कला ऐतिहासिक बदल आणि नवीन कला प्रकारांच्या निर्मितीसाठी केलेले नाविन्यपूर्ण उपक्रम चित्रित करतात.