मुंबई
सन १८६०
हाताने रंगविलेले कोरीव काम

हाताने रंगविलेली सदर कोरीव कलाकृती उंच माडाच्या झाडांचे आणि युरोपियन सादृश्य शैलीतल्या घरांचे मुंबई बंदर दाखवते. ह्या घरांचे सागवानी कंस विस्तृतपणे कोरलेले आणि हिरव्या लाल रंगात रंगविलेले दिसतात. ही कोरीव कलाकृती संग्रहालयाने अलीकडेच मिळवलेल्या अठराव्या ते विसाव्या शतकांतील छापील प्रति, पाषाणावरिल छापील प्रति (लिथोग्राफ्स), छायाचित्रं, धातूच्या पत्र्यावरून आम्ल व पाण्याच्या प्रक्रियेतून घेतलेले छाप (अक्वाटिंट्स) आणि धातूच्या प्रतिंपैकी एक आहे. हा संचय संग्रहालयाच्या स्थायी संग्रहाला वृद्धिंगत आणि अलंकारिक करतो.