होडीची प्रतिकृती
लाकूड
सूती कापड आणि सूती धागा

मुंबईहून, एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकांत, आसपासच्या किनारपट्ट्यांवर आणि लांबवरच्या व्यापारासाठी वापरल्या जाणाऱ्या स्थानिक होड्यांच्या लाकडी प्रतिकृतींचा व्यापक संग्रह संग्रहालयात आहे. ह्या प्रतिकृती बॉम्बे पोर्ट ट्रस्टने हाताने घडवून घेतलेल्या असून संग्रहालयास दानस्वरुपात देऊ केल्या आहेत. सदर 'होडी' ही सर्वत्र मासेमारी साठी वापरली जाणारी लोकप्रिय नाव असून ही किनारपट्टीनवरच्या बंदरांवरच बनवली जाते, आणि व्हल्यांनी ओढता येते; तसेच शीड लावूनही नेता येते.