संग्रहालयाबद्दल थोडक्यात

मोफत अभ्यास दौरे

प्रत्येक आठवडाअखेरीस संग्रहालयाच्या
अभिरक्षकांकडून संग्रहालयाची माहिती मिळवा

शनिवार
सकाळी ११.३० वा इंग्रजीतून
दुपारी १२.३० वा मराठी/हिंदी भाषेतून
सर्वांसाठी खुले.

उद्द्येश्य


डॉ. भाऊ दाजी लाड मुंबई शहर संग्रहालय समाजाच्या सेवेकरिता एक अशी संस्था म्हणून काम करण्याचे उद्देश्य ठेवते जी उत्कृष्ट प्रदर्शनांद्वारे आणि विविध दृक व वैचारिक माध्यमांतून सांस्कृतिक ज्ञानाच्या प्रसाराकरिता समर्पित असेल. संग्रहालय सामुदायिक उत्सुकता, विशेषतः लहान मुलांमध्ये, वाढवण्याकरिता प्रयत्नशील आहे. तसेच मुंबईच्या कलात्मक, सांस्कृतिक आणि आर्थिक इतिहासाच्या उच्चतम विकास व रसग्रहणाकरिता आणि सर्व स्तरांवर आंतर-सांस्कृतिक, अंर्तदृष्टि व जाणीवा वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्नशील आहे.