प्रत्येक आठवडाअखेरीस संग्रहालयाच्या
अभिरक्षकांकडून संग्रहालयाची माहिती मिळवा
शनिवार
सकाळी ११.३० वा इंग्रजीतून
दुपारी १२.३० वा मराठी/हिंदी भाषेतून
सर्वांसाठी खुले.
भारतात प्रथमच सांस्कृतिक संस्थेच्या व्यवस्थापनाकरिता सार्वजनिक-खाजगी स्वरूपाची भागीदारी प्रस्थापित झाली. फेब्रुवारी २००३ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका, जमनालाल बजाज प्रतिष्ठान आणि इनटॅक (इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड हेरिटेज) यांच्यात दुरावस्थेत असलेल्या डॉ. भाऊ दाजी लाड मुंबई शहर संग्रहालयाच्या पुनरुत्थानाकरता करार करण्यात आला.
जमनालाल बजाज प्रतिष्ठानाच्या साहाय्याने संग्रहालयाच्या नेत्रदीपक पुनरुत्थानाची नांदी झाली. बृहन्मुंबई महानगरपालिकेने केवळ समप्रमाणात सहाय्यच नाही केलं तर संग्रहालयचं व्यवस्थापन स्वायत्तपणे चालवं ह्या हेतूने अधिकची मुद्दलही देऊ केली, ज्यामुळे संग्रहालयात सुलभरित्या प्रदर्शने, शैक्षणिक आणि लोकहितपर कार्यक्रम राबवणे शक्य होईल. संग्रहालयाचे मालकी हक्क बृहन्मुंबई महानगरपालिकेकडेच कायम असून न्यासाच्या बांधणीत त्यांच्या सदस्यांचा वेटो अधिकार आहे.
न्यासाच्या समितीत ख्यातनाम कला इतिहासकार व मुंबईतील नागरीकांचा समावेश आहे. मुंबईचे माननीय महापौर ह्या समितीचे अध्यक्ष असून बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त समितीचे सह- अध्यक्ष आहेत.
डॉ. भाऊ दाजी लाड मुंबई
शहर संग्रहालय समाजाच्या सेवेकरिता एक अशी संस्था म्हणून काम करण्याचे उद्देश्य ठेवते जी उत्कृष्ट प्रदर्शनांद्वारे आणि विविध दृक व वैचारिक माध्यमांतून सांस्कृतिक ज्ञानाच्या प्रसाराकरिता समर्पित असेल.
बृहन्मुंबई महानगरपालिकेची संस्था
जमनालाल बजाज प्रतिष्ठानाच्या सहकार्याने कार्यरत
इन्टॅक, इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज द्वारे पुनरुज्जीवीत
पत्ता
वीर माता जिजाबाई भोसले उद्यान (राणीची बाग),
९१/अ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग,
भायखळा पूर्व, मुंबई ४०००२७, महाराष्ट्र, भारत
वेळ:
तात्पुरते बंद
दू. : +९१ २२ २३७४१२३४