प्रदर्शने

प्रदर्शनं आयोजित करण्याच्या कार्यक्रमाअंतर्गत समकालीन कलेला महत्वाचं स्थान देण्यात आलं आहे. संग्रहालयाचा इतिहास, येथील संग्रह आणि पुराभिलेख यांवर प्रतिसाद नोंदवण्यासाठी ‘परंपरेशी हितगुज’ ह्या प्रदर्शनांच्या मालिकेअंतर्गत विविध कलाकारांना आमंत्रित केलं जातं. ही प्रदर्शने संग्रहालयाच्या वास्तुतील कमलनयन बजाज विशेष प्रदर्शन दालनात सादर केली जातात आणि त्याअंतर्गत मांडण्यांतील स्थायी संचयातही क्वचित हस्तक्षेप केला जातो. इतर कलादालनं तसंच संस्थांच्या सहयोगाने संग्रहालयाच्या प्रांगणातील विशेष प्रकल्प दालनातही संग्रहालय प्रदर्शनांचं आयोजन करतं. संग्रहालयातील स्थायी संग्रहाशी संलग्न समकालीन कलाकारांच्या प्रदर्शनांच्या आयोजनासाठी आंतरराष्ट्रीय संग्रहालयं आणि संस्थांसोबत संग्रहालयाने यशस्वीरित्या भागीदारी केली आहे.


गतकालीन