प्रदर्शने

मोफत अभ्यास दौरे

प्रत्येक आठवडाअखेरीस संग्रहालयाच्या
अभिरक्षकांकडून संग्रहालयाची माहिती मिळवा

शनिवार
सकाळी ११.३० वा इंग्रजीतून
दुपारी १२.३० वा मराठी/हिंदी भाषेतून
सर्वांसाठी खुले.

आभूषित दस्ताऐवजः वसाहतकालीन टपालपत्रे

प्रदर्शन संकल्पनाः ओमार खान | संकल्पना सहाय्यः रहाब अलाना

१९ ऑगस्ट - १ऑक्टोबर २०१८

चित्रमय टपालपत्रं पाठवण्याची पद्धत रुढ झाली ती १८९०च्या सुमारास. दूताची भूमिका पेलणारं संदेशवहनाचं हे नवं रुप अल्पावधीतच सर्वत्र दिसू लागलं. ५० वर्षांपूर्वी संशोधित छायाचित्रण कला असो वा जनसामान्यांना वैयक्तिक छायाचित्रं काढण्याची संधी देणारं १८८०च्या दशकात कोडॅक कॅमेराचं केलं गेलेलं उत्पादन; चित्रमय टपालपत्रं केवळ ह्या कारणांसाठीच ओळखली जात नाहीत, तर ती ज्ञात आहेत ती मित्र-परिवारास वा व्यापारानिमित्त जगभरात कुणालाही वेगवान संदेश पोहचवण्याच्या सुविधेसाठी.

छोटेखानी कार्यशाळांतून तसंच युरोप आणि भारतातील काही शहरांतील कलाकरांनी रॅपिड प्रेस लिथोग्राफीचा वापर करुन मुद्रण करण्यास प्रारंभ केला; आणि १८९३ साली शिकागो येथे भरलेल्या वर्ल्ड कोलंबियन एक्स्पोसिशमच्या प्रसिद्धीसाठी जाहीरात करणारं पहिलं चित्रमय टपालचित्र सिंगर मॅन्युफॅक्चरिंग को. यांनी १८९२ साली प्रकाशित केलं. स्वामी विवेकानंदानी आपल्या ऐतिहासिक व्याख्यानात हिंदुत्वाची संकल्पना आपल्या व्याख्यानांच्या शृंखलेतून मांडली आणि चित्रकार राजा रवि वर्मा यांनी सुवर्ण पदक मिळवलं, ह्या एक्स्पोसिशनने भारतात अमेरिकेचा पहिला अधिकृत प्रवेश नोंदवला.

साधारण १८९७ साली कलकत्ता येथे आयोजित डब्ल्यू. रोस्लर यांच्या प्रदर्शनात कदाचित पहिल्यांदाच ग्रीटिंग्ज् फ्रॉम इंडिया अर्थात भारतातून शुभेच्या दिल्या गेल्या. अब्जावधी टपालपत्रांची देवाणघेवाण १८९८ ते १९०३ च्या दरम्यान केली गेली. जर्मनीत १०० दशलक्ष ते १.२ अब्ज टपालपत्रांची निर्मिती केली गेली; म्हणजे पृथ्वीतलावरील हरएक व्यक्तीमागे दोन टपालपत्रं पाठवली गेली. टपालपत्रांची गुंफण आंतरराष्ट्रीय होतीः जर्मनीतील ड्रेस्डेन येथील प्रकाशनांना एक छायाचित्र पाठविलं गेलं, तेथील छापखान्यानी त्याची टपालपत्रं तयार केली आणि जयपूरला पाठवली, हवामहालाच्या बाहेर त्यांची विक्री केली गेली. आणि तिथून एका पर्यटकाने घेतलेलं एक टपालपत्र त्याने मुंबईहून लंडनला पाठवलं. हे सारं दोन आठवडय़ांच्या कालावधीत काही आणे अथवा पेनीज् च्या मोबदल्यात घडून आलं.

सदर प्रदर्शन भारतातील मुख्य शहरांतील चित्रमय टपालपत्रांच्या आयुर्मानाविषयी भाष्य करतं. ही टपालपत्रं शहरीकरण, कला साधना आणि जनसंस्कृती, औद्योगिकीकरण आणि पर्यटन, सामाजिक स्थित्यंतरं आणि ओघानंच स्वातंत्र्यलढय़ाचा उगम आणि राष्ट्रीयत्वाविषयीच्या संकल्पना मांडतात.

प्रदर्शनाचा उर्वरीत भाग ह्याच मजल्यावरील विरुद्ध बाजूला स्थित प्रक्षेपक खोली अर्थात मुंबई शहर दालन आणि विशेष प्रकल्प दालनात आपल्याला पाहता येईल. येथील पहिल्या खोलीत आपल्याला विविध संस्थानांची तसंच सिलोन येथील दक्षिण आशियाई अस्मिता मांडणारी टपालपत्रं पहायला मिळतील. पुढील खोलीत आपण मुंबईत असल्याने, पूर्वाश्रमीच्या मुंबईच्या प्रतिमा आपल्याला दिसतील, यात केवळ शदरचित्रांचा वा वरिष्ठ वर्गातील समुदायाचाच समावेश नाही तर पौराणिक कथा, तसंच ज्यांनी शहराबाहेरच आपल्या छापखान्याची स्थापना केली त्या राजा रवि वर्मा यांची रुपकात्मक चित्रेही आपल्याला पाहता येतील. ज्यांनी आपली व्यावसायिक कारकीर्द ह्या शहरात व्यतीत केली त्या महादेव विश्वनाथ धुरंधर यांची कलात्मक निर्मिती त्यांच्या १६० व्या जन्मवर्षानिमित्ताने, संग्रहाच्या मागील भागात स्थित विशेष प्रकल्प दालनात मांडण्यात आली आहे. प्रदर्शनाच्या शेवटच्या भागात (सिमला, उटी ही) थंड हवेची ठिकाणं आणि काश्मिर येथील प्रसिद्ध प्रतिमा, तसंच स्वातंत्र्य चळवळीच्या प्रतिमा समाविष्ट करण्यात आल्या आहेत.


Image Gallery