प्रदर्शने

मोफत अभ्यास दौरे

प्रत्येक आठवडाअखेरीस संग्रहालयाच्या
अभिरक्षकांकडून संग्रहालयाची माहिती मिळवा

शनिवार
सकाळी ११.३० वा इंग्रजीतून
दुपारी १२.३० वा मराठी/हिंदी भाषेतून
सर्वांसाठी खुले.

टि. व्हि. संथोष

इतिहासाची प्रयोगशाळा आणि ठसठसणाऱ्या वेदनांचं रुदन

डॉ भाऊ दाजी लाड संग्रहालयाची प्रस्तुती

गिल्डच्या सहयोगाने

डिसें १४,२०२३ - फेब्रु ११, २०२४

विशेष प्रकल्प दालन, संग्रहालयाचं प्रांगण

"इतिहासाची प्रयोगशाळा |V, ह्या शीर्षकाअंतर्गत भरवलेल्या प्रदर्शनातील एक शिल्प, औद्योगिक आणि तांत्रिक प्रगतीद्वारे परिभाषित केलेल्या प्रगतीच्या गवाक्षातून इतिहास उलगडण्याची प्रक्रिया मांडतं. ह्यात, प्रगतीचे उच्चांक हे माणसानं माणसांच्याच केलेल्या विनाशाचे मापदंड कसे बनतात, युद्धाचा इतिहास हा शस्त्रं, तंत्रज्ञानाच्या विकासासोबत कसा मार्गक्रमण करतो, असे, इतिहासाचे, गुंतागुंतीचे पदर आपल्याला पाहायला मिळतात…" - टि. व्ही. संथोष

सदर प्रदर्शनात संथोषच्या अलीकडे साकारलेल्या कलाकृती तसंच गेल्या अनेक वर्षांत आकाराला येत गेलेल्या कलाकृती प्रस्तुत करण्यात आल्या आहेत, ज्यात समाज आणि इतिहास, विशेषत: युद्ध आणि हिंसेचं पृथ्थकरण केलं आहेच, शिवाय वास्तवाला कवेत घेताना घडत जाणारी आपली समज, इथं कलाकारानं अधोरेखित केली आहे. जलरंग, कॅनव्हासेस् आणि शिल्पांचा समावेश असलेल्या कलाकृती, राजकिय धारणांच्या सूचक बोधचिन्हांतून प्रतीत होणारी दृश्य संस्कृती, आणि कलाकाराच्या कलासाधनेतील प्रेरणा मांडतात.

केरळमध्ये जन्मलेल्या टी.व्ही. संथोष यांनी शांतिनिकेतनमधून चित्रकला विषयात बी.एफ्.ए. आणि बरोद्यातील महाराजा सयाजी विद्यापीठातून शिल्पकलेत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. संथोष यांच्या कलाकृती संग्रहालयं तसंच बिएनालेंत मोठ्या प्रमाणावर मांडण्यात आल्या आहेत.

दर शनिवार आणि रविवारी सकाळी ११.३० ते १२.३० दरम्यान इंग्रजीतून आणि दुपारी १२.३० ते ०१.३० दरम्यान हिंदी/मराठी भाषेतून प्रदर्शनाचा अभ्यास दौरा आयोजित केला जाईल.


Image Gallery