सैनी कल्लाट यांच्या कलाकृतींत, अन्याय आणि माणसाचा मदमत्त स्वभाव यांच्यातील घट्ट नात्याचं प्रतिबिंब उतरलेलं दिसतं. माणसांचं परस्परांसोबतचं नातं, त्यांना आपल्या मातीबद्दल वाटणारी जवळीक, बांधिलकी आणि काळजी, यांतच मनुष्यस्वभावाच्या विविध छटांची मुळं दडलेली दिसतात. पृथ्वीवरील जीवन कायम ठेवणारे बंध घट्ट करण्याचा जागरुक विचार लावून धरणाऱ्या सैनी कल्लाट यांच्या कलाकृती, दयाळू, सौम्य, आणि अधिक न्याय्य जगापुढे केलेलं काव्यात्म आवाहनच आहे.