प्रदर्शने

मोफत अभ्यास दौरे

प्रत्येक आठवडाअखेरीस संग्रहालयाच्या
अभिरक्षकांकडून संग्रहालयाची माहिती मिळवा

शनिवार
सकाळी ११.३० वा इंग्रजीतून
दुपारी १२.३० वा मराठी/हिंदी भाषेतून
सर्वांसाठी खुले.

माझ्या जगण्याला ज्यांचा स्पर्श झालाय

अलामु कुमारेसन यांचं पहिलं एकल प्रदर्शन
अनुपा मेहता समकालीन कलेच्या सहयोगाने

२७ जुलै - २ सप्टेंबर, २०२४

विशेष प्रकल्प दालन, संग्रहालयाचं प्रांगण
सकाळी १०.०० - संध्याकाळी ०५.३०
मोफत प्रवेश



सदर प्रदर्शन व्यक्तिचित्रं आणि आत्मचित्रं एकत्रितपणे प्रस्तुत करतं ज्यामुळे कलाकार साकारत असलेल्या वैयक्तिक कथासूत्रांचा मागोवा घेणारी कलाकाराची कलासाधना आपल्यापर्यंत प्रभावीपणे पोहचते. अलामुची कला तिच्या जीवनाला स्पर्श करणाऱ्यांना श्रद्धांजली म्हणून वाचता येऊ शकते. ती तिच्या कलाकृतींतून, रोजच्या जगण्याला उल्लेखनीय रुप बहाल करते. इथं रोजचा दिवस नायक बनतो, आणि रंगलेपनाच्या आणि कापडांच्या वैविध्यातून साकरलेल्या वस्त्रनमुन्यांना कलाकार खास बनवत जाताना दिसते. अलामुच्या कथनांमध्ये एक कालातीतपणा आहे, जो सामान्य माणसाला दिल्या जाव्या अशा आदराला वैश्विकतेचा आयाम देत त्याचं माप वाढवत जातो.
व्यक्तिचित्रांव्यतिरिक्त, अलामु निसर्गातील अशाश्वत आपल्या अमूर्त टेपेस्ट्री आणि निसर्गचित्रांतून साकारते. दक्षिण भारतातील कराईकुडी येथील तिच्या परिवाराकडे वारस्याने आलेल्या धागा, तागा, मऊ लोकरीची वीण आणि शिलाईच्या विविध तंत्रांचा वापर ती करते. क्रोशे, मणीकाम आणि भरतकामाच्या विविध तंत्रांत कुशल असलेल्या आपल्या आजी आणि आईच्या गुंतागुतीच्या हस्तकौशल्यावरुन प्रेरणा घेत, ती त्यांच्या विणकामाचा प्रभाव आपल्या चालू कामांत उतरु देताना दिसते. शिलाईच्या तसंच भरतकामाच्या विविध तंत्रांचा सर्जनशील वापर करताना अलामु केवळ आपल्या आईकडून आलेल्या वारस्याची आठवण सांगत नाही तर सर्जनशील स्त्रीसुलभ आविष्काराची एक समृद्ध परंपरा पुढे नेते जी काही काळापूर्वी केवळ उपेक्षित वर्गाकडे सोपवली होती.

अलामु कुमारेसन हिने मद्रास विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या शासकिय ललित कला महाविद्यालयातून चित्रकलेत पदव्युत्तर पदवी संपादित केली आहे. तिने २०२३ साली कोरियातील भुसान येथे इंकोच्या कोरिया सुवर्ण महोत्सवात आयोजित आंतरराष्ट्रीय विनिमय प्रदर्शनात; २०२४ साली इंको सेंटरने ‘संगम’ ह्या चेन्नई बिएनालेत ललित कला अकादमीतर्फे आयोजित प्रदर्शनात आपला सहभाग नोंदवला आहे.


Image Gallery