प्रत्येक आठवडाअखेरीस संग्रहालयाच्या
अभिरक्षकांकडून संग्रहालयाची माहिती मिळवा
शनिवार
सकाळी ११.३० वा इंग्रजीतून
दुपारी १२.३० वा मराठी/हिंदी भाषेतून
सर्वांसाठी खुले.
म्युझियम कट्टा
नेहा कुलकर्णी आणि अक्षय शिंपी
शनिवार, मार्च १५, २०२५ | संध्याकाळी ५ वा.
स्थळ: शैक्षणिक केंद्र, डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाचं प्रांगण
जन्म-मृत्यूची घडी उलगडू पाहणाऱ्या रामजीची गोष्ट सादर करतील दास्तानगो नेहा कुलकर्णी आणि अक्षय शिंपी.
राहून गेलेलं क्षेत्रावलोकन, ह्या कलाकार रीना सैनी कल्लाट यांच्या सध्या संग्रहालयात सुरु असलेल्या प्रदर्शनात, कलाकार माणसाच्या मदमत्त स्वभावाचं दर्शन घडवून आणतात. नद्या आणि त्याभवतालची संस्कृती, नैसर्गिक आपत्ती, स्थलांतर आणि काहीतरी गमावणं, आणि त्यानंतर आपलं अस्तित्व नव्यानं शोधण ह्या प्रक्रियेला हात घालताना त्या आपल्या भवतालाला आणि आपल्या मनोव्यापारांना जोडत जातात. प्रदर्शनात उपस्थित केलेल्या ह्याच मुद्द्यांना हात घालणाऱ्या ह्या कार्यक्रमासाठी जरुर उपस्थित रहा!
नोंदणी: नोंदणीस्थळ
बालदोस्तांसाठी पुस्तकांचा कोपरा हा संग्रहालयाने २०२४ मध्ये सुरू केलेला एक महत्वाचा उपक्रम आहे. आता वाचन हे उत्तम आरोग्यासाठीही चांगलं असल्याचं सिद्ध झालंय, पण मुळात मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, पुस्तकवाचनाची सवय लागावी ह्या उद्देशाने संग्रहालयाच्या प्रांगणातील शांत, हिरव्यागार जागेत स्थित उपहारगृहात लहान मुलांना भावतील अशा निवडक पुस्तकांचा कोपरा साकारण्यात आलाय. पुस्तकांच्या संग्रहामध्ये रंजक आणि शैक्षणिक संग्रहासोबत इतिहास, कला, निसर्ग आणि मुंबई शहरावरील इंग्रजी, हिंदी आणि मराठी पुस्तकांचा समावेश करण्यात आला आहे.
लेखक आणि शिक्षकांसोबत, या उपक्रमाचाच एक भाग म्हणून, महिन्याकाठी पुस्तक वाचन आणि कथाकथनाच्या सत्रांचं आयोजन केलं जातं. बुधवार आणि निवडक सार्वजनिक सुट्ट्या वगळता पुस्तकांचा कोपरा संपूर्ण आठवड्यात सर्वांसाठी विनामूल्य आणि खुला.
संग्रहालयाच्या आवारातून पुस्तकं बाहेर नेता येणार नाहीत.
वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ०५.३० पर्यंत
नोंदणी: इथे क्लिक करा
डाॅ भाऊ दाजी लाड संग्रहालय आता स्पाॅटिफायवर! ट्युन करा आमची नव्यानं रचलेली प्लेलिस्ट!
डाॅ भाऊ दाजी लाड संग्रहालयातील रागमाला लघुचित्रांवर आधारित प्लेलिस्टला भेट देण्यासाठी ट्युन करा. संग्रहालयाच्या स्थायीसंग्रहातील रागमाला चित्रे जयपूरच्या लघुचित्र परंपरेतून साकारल्याचं दिसतं. रागमाला अर्थात रागांची माळ/हार. ह्यावरुन प्रेरित लघुचित्रेरागाचं व्यक्तिचित्र साकारतात. भारतीय शास्त्रीस संगीतात ह्या रागांची विविध ऋतू, वेळ आणि भावांशी संलग्न बांधणी असते. ऐकणाऱ्याच्या मनात विशिष्ट भाव जागृत करण्याच्या हेतूने त्यांची रचना केलेली असते. गायक आणि वादकांच्या प्रयोगशीलअभ्यासासाठी हे राग पुरेसा अवकाश देतात. ह्या प्लेलिस्टमध्ये भारतातील ख्यातनाम कलावंतांनी भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रांतातपेश केलेल्या रचना समाविष्ट करण्यात आल्या आहेत. ह्या प्लेलिस्टची सुरुवात प्रात:काळात गायल्या जाणाऱ्या रागांच्या रचनांपासूनहोऊन सांजवेळ प्रफुल्लित करणाऱ्या रचनांसोबत त्याची गोडी वाढत जाते.
स्वप्नांच्या शहराला समर्पित आमची नवी प्लेलिस्ट ट्युन करा. ‘ये है मुंबई मेरी जान’पासून ‘गली बाॅय’पर्यंत ही प्लेलिस्ट शहराचा अर्कसामावून घेते. १८९०च्या सुमारास प्रचलित भेंडीबजार घराणं ते सध्याचं बाॅलीवुड संगीत, शहराच्या पार्श्वभूमीवर आकाराला आलेल्यासंगीताच्या विविध प्रवाहांना ही प्लेलिस्ट समाविष्ट करुन घेते. शहर आणि शहरवासियांवरुन प्रेरित गाणी ह्या प्लेलिस्टमध्ये निवडलेलीआहेत.
एक एक भाग जोडा, आणि तुमची अनमोल कलाकृती घडवा!
तुम्हांला हे जिगसाॅ पझल सोडवायला किती वेळ लागला?
स्क्रिनशाॅट काढा आणि इन्स्टाग्राम, फेसबुकआणि ट्विटरवर @bdlmuseumला टॅग करा. इथे क्लिक करा.