संग्रहालयास भेट

मोफत अभ्यास दौरे

प्रत्येक आठवडाअखेरीस संग्रहालयाच्या
अभिरक्षकांकडून संग्रहालयाची माहिती मिळवा

शनिवार
सकाळी ११.३० वा इंग्रजीतून
दुपारी १२.३० वा मराठी/हिंदी भाषेतून
सर्वांसाठी खुले.

 दिशानिर्देश


पत्ता

डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय ,
वीर माता जिजाबाई भोसले उद्यान (राणीची बाग) ,
९१/अ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, भायखळा पूर्व,
मुंबई ४०००२७, महाराष्ट्र, भारत
+९१ २२ २३७४ १२३४
+९१ २२ २३७१ ४११९

समन्वयक

18°58'46.4"N 72°50'05.3"E

इथे कसे पोहोचाल

राणीची बाग येथील (प्राणीसंग्रहालय), भायखळा पूर्व हि ह्या जागेची सर्वात महत्वाची खूण. संग्रहालय ह्या बागेच्याच आवारात भायखळा पूर्व रेल्वे स्थानकापासून चालत २ मिनिटे अंतरावर आहे.Station.

संपर्क साधा


 वेळ:

कृपया लक्षात घ्या की संग्रहालय सध्या देखभालीसाठी बंद आहे.
सार्वजनिक सुट्ट्या

 तिकीट दर

भारतीय नागरीक

(ह्यात ओळखपत्र असलेले मूळ भारतीय PIO, परदेशी भारतीय OCI, परदेशात रहिवासी भारतीय NRI ह्यांचा समावेश असेल)
प्रौढ, वय वर्षं १३ आणि अधिक- रु. १०/-
बालक, वय वर्षं ६ ते १२- रु. ५/-
शिशु, वय वर्षं ५ आणि कमी - मोफत
विद्यार्थी, वय वर्ष १२ हुन कमी (शाळेच्या गटाबरोबर किंवा वैध ओळखपत्र दाखवून)- रु. २/-
विद्यार्थी, वय वर्षं १३ आणि अधिक (शाळा. महाविद्यालयाच्या गटाबरोबर किंवा वैध ओळखपत्र दाखवून)- रु. ५/-

शाळा व इतर समूह प्रवेश आगाऊ राखून ठेवण्याकरीता education@bdlmuseum.org किंवा +९१ २२ २३७२ १२३४ ला संपर्क साधावा


आंतरराष्ट्रीय नागरिक

प्रौढ, वय वर्षं १३ आणि अधिक- रु. १००/-
Cबालक, वय वर्षं ६ ते १२- रु. ५०/-
विद्यार्थी (वैध ओळखपत्र दाखवून)- रु. ३०/-
शिशु, वय वर्षं ५ आणि उणे- मोफत

साठी मोफत प्रवेश

बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचारी (वैध ओळखपत्र असलेले), बृहन्मुंबई महानगरपालिका शाळेचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, दिव्यांगजनांना प्रवेश मोफत असेल.
* संग्रहालयात होणाऱ्या कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांकरिता तिकीट घेणे अनिवार्य आहे.

  येथे येण्यासाठी सुलभ साधने

बसने

वीर माता जिजाबाई भोसले उद्यानाकडे (राणीची बाग)
बस क्र. १,३,५,६ मर्या., ७ मर्या., ८ मर्या., ९, ११ मर्या., १५, १८, १९ मर्या., २१ मर्या., २२ मर्या., २५ मर्या., ५०, ५१, ६४, ६७, ६९, १२६, १३४, १६८, ५० मर्या.

रेल्वेने

मध्य रेल्वे मार्ग - भायखळा पूर्व स्थानक, २ मिनिटे चालत
पश्चिम रेल्वे मार्ग - महालक्ष्मी स्थानक, १० मिनटे जेकब सर्कलवरून टॅक्सीने
हार्बर रेल्वे मार्ग - रे रोड स्थानक, ५ मिनिटे टॅक्सीने, १० मिनिटे चालत

वाहन तळ

काही शुल्क भरून दुचाकी, चार चाकी गाड्या तसेच बस लावण्याची सुविधा संग्रहालयाच्या आवारात उपलब्ध आहे.

दिव्यांगजन अभ्यागत

संग्रहालयात चाकांची खुर्ची (व्हीलचेअर) वापरण्याची व्यवस्था आहे. संग्रहालय व प्लाझामध्ये उतारांवरून सहज फिरता येते, तसेच पहिल्या मजल्यावर जाण्याकरीता उद्वहनयंत्र (लिफ्ट) उपलब्ध आहे.

 संग्रहालयाचा माहितीदौरा

मोफत सार्वजनिक माहितीदौरा

दर शनिवार संग्रहालयाच्या कलाप्रबंधकांपैकी एक जण संग्रहालयाचा मोफत माहितीदौरा देतात. हा दौरा विविध वयाच्या, पार्श्वभूमीच्या आणि आवडी असलेल्या अभ्यागतांना संग्रहालयातील कलावस्तू, इतिहास, वास्तू आणि समकालीन प्रदर्शनांशी परिचय करुन देतो. ह्याकरता कोणत्याही प्रकारच्या पूर्व नोंदणीची आवश्यकता नसून अधिक माहिती वा सहभागी होण्यासाठी तिकीट केंद्रावर चौकशी करावी.
प्रत्येक शनिवार
सकाळी ११.३०- इंग्रजी
दुपारी १२.३०- हिंदी/ मराठी

खाजगी माहितीदौरा

समूह विशेष विषयांवर आधारीत माहिती दौऱ्याच्या आयोजनाची आगाऊ मागणी करू शकतात. ह्यात मुंबईचा इतिहास, विकास आणि सांस्कृतिक वारसा ह्या विषयांवर केंद्रित असलेला माहितीदौरा अतिशय लोकप्रिय आहे. संग्रहालयातील मर्यादित काळासाठी मांडलेल्या विशेष प्रदर्शनाकरिता माहिती दौऱ्याच्या आयोजनासाठी आगाऊ नोंद समूहांकडून केली जाऊ शकते. आमचे हे दौरे विविध वयोगट व आवडीच्या लोकांकरिता नियोजित केले जाऊ शकतात.

शालेय समूह | महाविद्यालयीन समूह | खाजगी समूह


 ध्वनी/श्राव्य मार्गदर्शक

सध्या कोविड-१९ मुळे ध्वनी/श्राव्य मार्गदर्शक उपलब्ध नाही ह्याची अभ्यागतांनी नोंद घ्यावी.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून संग्रहालयाचा इतिहास, वास्तू व संग्रह कथा संग्रहालयाचे माहितीप्रद श्राव्य मार्गदर्शक सुरसरित्या जिवंत करतात.

भाषा

श्राव्य मार्गदर्शक इंग्रजी, हिंदी व मराठी भाषांमध्ये उपलब्ध आहेत

मूल्य

भारतीय नागरिक: रु. ३०/-
आंतरराष्ट्रीय नागरिक: रु. ५०/-
नोंद: ठेवी दाखल आपले वैध छायाचित्रित ओळखपत्र असणे आवश्यक.

 विक्री केंद्र

संग्रहालयातील विक्री केंद्र पारंपरिक कारागीर आणि स्वयंसेवी संघटनांना मदत करते. इथे विशेष निवडलेल्या भेटवस्तू आहेत, शिवाय बऱ्याचशा भेटवस्तू संग्रहालयातील कलावस्तूंच्या प्रेरणेतून निर्माण झालेल्या आहेत. येथे संग्रहालयावरुन प्रेरित मग, पिशव्या, पोस्टकार्डस्, पपेटस्, रोजनिशी व चुंबके, तसेच काही पारंपरिक वस्तू जसे कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या वस्तू, बिद्रीकाम, शाली आणि कांस्य शिल्पं मांडण्यात आली आहेत. सहज वाचनीय चित्र पुस्तकं, कलाकारांची चरित्रं आणि मुंबई शहरावर आधारित अनेक प्रकाशने येथे उपलब्ध आहेत.

१५०व्या वर्धापनदिनानिमित्त, संग्रहालयाने तस्नीम झकारिया मेहता यांनी संपादित केलेलं 'मुंबई: कलावस्तुंच्या माध्यमातून शहराचा मागोवा, डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहायातील १०१ कथासूत्रं' ह्या शीर्षकाचं नवीन पुस्तक सह-प्रकाशित केलं आहे.

सदर प्रकाशन ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध.


 उपहार गृह

अभ्यागतांना प्रदर्शन बघताना वा एखादा कलाप्रयोग बघताना काही क्षण विश्राम करण्याची संधी येथे मिळते. प्रांगणाच्या मोकळ्या हिरव्यागार आवाराच्या दिशेकडे पाहणारे संग्रहालयाचे उपहार गृह आहे; इथे चहा, कॉफी, अल्पोपहार, थंड पेय आणि मोफत वायफाय उपलब्ध आहेत.

 संग्रहालयाचे धोरण

संग्रहालयाचा पूर्ण प्रयत्न असतो की अभ्यागतांची प्रत्येक भेट विशेष आणि आठवणीतली असावी. आम्ही आशा करतो की आपण इथे आल्यावर संग्रहालयाच्या आवारात नमूद केलेल्या नियमांचे पालन करून आम्हाला साहाय्य कराल.

 • केवळ संपूर्ण लसीकरण झालेल्या प्रौढांनाच संग्रहालयात प्रवेश मिळेल याची कृपया नोंद घ्यावी. लसीकरण प्रमाणपत्राची डिजीटल वा भौतिक प्रत संग्रहालयात प्रवेश करण्यापूर्वीच बाहेर काढून ठेवावी.

 • संग्रहालय व प्रांगणाच्या आवारात सतत मास्क घालणे/नाक-तोंड झाकलेले असणे अनिवार्य आहे.

 • ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि ५ वर्षांखालील शिशूंनी शक्यतो संग्रहालयाला भेट देणे टाळावे आणि आल्यास विशेष काळजी घ्यावी.

 • कोविड- १९ चा संसर्ग टाळण्यासाठी तिकिटासाठी रांगेत आखून दिलेल्या वर्तुळांमध्ये उभे रहा व आपल्या व इतर अभ्यागतांमध्ये योग्य अंतर ठेवा.

 • कोविड- १९ चा संसर्ग टाळण्यासाठी सामान ठेवण्याची जागा तात्पुरती निलंबित करण्यात आली आहे.

 • संग्रहालयातील दालनांत प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशद्वाराजवळ ठेवलेल्या स्वच्छता द्रव्याने (सॅनिटायझर)आपले हात स्वच्छ करावेत.

 • संग्रहालय व प्रांगणाच्या आवारात दोन किंवा तीन पेक्षा अधिक लोकांच्या समूहात फिरू नये व

 • कोणत्याही तावदानाला वा दुभाजकांना स्पर्श करणे टाळावे.

 • एकदा वापरून टाकण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या संग्रहालयात आणण्यास मनाई आहे.

 • एकदा वापरून टाकून देण्याचे मास्क व हातमोजे संग्रहालयाच्या आवारात त्याकरीता विशेष राखून ठेवलेल्या कचरापेटीतच टाकावेत.

 • संग्रहालयाच्या प्रांगणात स्थित शौचालयांमध्ये हात धुण्याकरीता तेथे ठेवलेल्या द्रव साबणाचा वापर करावा.

 • संग्रहालयाच्या प्लाझा मध्ये शुद्धीकरण केलेले पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.

 • आणीबाणीच्या परिस्थितीत दालनपरिचालकांना वा संग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करावे.

 • संग्रहालय सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बुधवार आणि निवडक सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळता आठवड्यातील सर्व दिवस सुरु राहिल. तिकिटघर संध्याकाळी ५.३० वा बंद होईल. संग्रहालय दर बुधवारी बंद राहिल.

 • संग्रहालयातील ग्रंथालय पुढील सूचना मिळेपर्यंत अभ्यागत व अभ्यासकांकरीता बंद राहील.

 • संग्रहालयातील उपहार गृह आणि शैक्षणिक केंद्र पुढील सूचना मिळेपर्यंत अभ्यागतांकरिता बंद राहील.

 • अभ्यागतांना निवेदन आहे की त्यांनी आपल्या सुरक्षिततेसाठी आणि सर्व नियमांच्या पालनासाठी संग्रहालयातील कर्मचारी आणि सुरक्षा अधिकाऱ्यांना सहकार्य करावे.

 • आपल्या सामानाची व बरोबर असलेल्या लहान मुलांची व्यवस्थित काळजी घ्यावी.

 • छायाचित्रणाविषयी संग्रहालयाची प्रस्थापित (खाली दिलेली) नियमावली लक्ष देऊन वाचावी.

 • संग्रहालय व आवारात कोठेही धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे.

 • आपणास दूरभाष यंत्रांवर बोलायचे असल्यास कृपया संग्रहालयाच्या दालनांतून बाहेर जाऊन बोलावे, जेणेकरून इतर अभ्यागतांना त्रास होणार नाही.

 • संग्रहालयाच्या आवारात बाहेरचे अन्नपदार्थ वा पेय आणण्यास सक्त मनाई आहे.

 • संग्रहालयाच्या आवारात कोणत्याही स्वरूपाचे शस्त्र वा ज्वलनशील वस्तू/पदार्थ आणण्यास सक्त मनाई आहे.

 • संग्रहालयाच्या आवारात चघळण्याच्या गोळ्या, गुटखा किंवा पान खाण्यास सक्त मनाई आहे.

 छायाचित्रणाबाबतचे निर्देश

 • संग्रहालयात आलेल्या अभ्यागतांना वैयक्तिक तसंच अव्यावसायिक उपयोगासाठी छायाचित्रं घेण्यास परवानगी आहे.

 • संग्रहालयाच्या आवारात घेतलेली छायाचित्रं कोठेही प्रकाशित करण्यास, विकण्यास, त्याच्या प्रतिकृती निर्माण करण्यास, हस्तांतरीत करण्यास, वितरण करण्यास किंवा इतर कोणत्याही प्रकारे व्यावसायिक उपयोगात आणणयस परवानगी नाही.

 • अभ्यागतांना संग्रहालयातील स्थायी संग्रह व प्रांगणामध्ये कोणत्याही साधन सामग्री, जसे ट्रायपॉड, मोनोपॉड आणि फ्लॅशशिवाय छायाचित्रं काढण्यास परवानगी आहे.

 • चित्रफीत आणि चलचित्रांसाठी छायाचित्रण यंत्राचा वापर करण्यावर सक्त प्रतिबंध आहेत.

 • छायाचित्रं काढताना इतर अभ्यागतांच्या अनुभवाचे आणि व्यक्तिगत अंतराचे भान ठेवावे.

 • इतर अभ्यागतांचे, कर्मचाऱ्यांचे, प्रशासकीय कार्यालयांचे, इनटॅकच्या संवर्धन प्रयोगशाळेचे, इनटॅक दस्तऐवजीकरण केंद्राचे, विशेष प्रदर्शन विभागाचे, विशेष प्रकल्प विभागाचे आणि शेक्षणिक केंद्राचे आगाऊ परवानगी शिवाय छायाचित्रण करू नये.

 • संग्रहालयाच्या विक्री केंद्रात व्यावसायिक कारणांमुळे छायाचित्रण करण्यास मनाई आहे.

 • बातमी संबंधित प्रकाशन, व्यावसायिक चित्रपट आणि छायाचित्रणासंदर्भात कोणताही प्रश्न असल्यास +९१ २२ २३७३१२३४/६५५६०३९४ किंवा enquiry@bdlmuseum.orgवर संपर्क साधावा.

संग्रहालय सीसीटीव्ही च्या निरीक्षणा खाली आहे. आवारात छायाचित्रण करण्यासाठी किंवा संग्रहालयातील कलावस्तूंच्या छायाचित्रांच्या प्रतिकृती निर्माण करण्याची परवानगी देण्याचे/काढून घेण्याचे सर्व हक्क संग्रहालयाच्या अधिकाराखाली राखीव आहेत.