प्रदर्शने

मोफत अभ्यास दौरे

प्रत्येक आठवडाअखेरीस संग्रहालयाच्या
अभिरक्षकांकडून संग्रहालयाची माहिती मिळवा

शनिवार
सकाळी ११.३० वा इंग्रजीतून
दुपारी १२.३० वा मराठी/हिंदी भाषेतून
सर्वांसाठी खुले.

नव्याने गवसलेला भूभाग

भारतीय निसर्गचित्रं - साम्राज्यापासून स्वातंत्र्यापर्यंत

नोव्हेंबर २७, २०२१ - एप्रिल १९, २०२२

डॅगच्या सहयोगाने

संकल्पना जाइल्स टिलॉटसन

कमलनयन बजाज विशेष प्रदर्शन दालन

निसर्गचित्र हा चित्रांसाठीचा सर्वात नैसर्गिक आणि स्वाभाविक विषय असावा असे आपणास सहज वाटून जाईल. निसर्ग जगताला कलात्मक प्रतिसाद देऊन त्यात सहज समरसून जाणे ह्याहून सोपे मानवासाठी काय असू शकते? मात्र अगदी पूर्वीपासून मानवी सभ्यतांनी निसर्गचित्रं चितारलेली आढळून येत नाहीत. निसर्गचित्रांची स्वतःची अशी वेगळी शैली असते. साधारणतः ९व्या शतकातील प्रारंभिक घटनांवर लक्ष केंद्रित न करता, दृश्यांवर लक्ष केंद्रित करून निसर्गचित्रं काढण्याची कला चिनी लोकांनी अवगत केली आणि त्यात ते पारंगत झाले. १८ व्या शतकात ह्या कलेला फक्त इंग्रजांची कला म्हणून वाखाणण्यात आले. भारतीय कलेमध्ये अजिंठा येथील भित्तीचित्रांमधून निसर्गाचे घटक साकारल्याचे दिसून येते, परंतु त्यात ते मुख्यतः धार्मिक किंवा दरबारी प्रतिमांसोबत सहाय्यक भूमिकेच्या दृष्टीने दाखवण्यात आलेले दिसतात. औपनिवेशक शैलीला प्रतिसाद म्हणून १९ व्या शतकात भारतामध्ये केवळ निसर्ग चितारण्याच्या उद्देशानेच निसर्गचित्रांचा उदय झाला.

सदर प्रदर्शन १७८० ते १९८० या दोनशे वर्षांच्या कालावधीतील भारतीय निसर्गचित्रांचा आढावा घेते. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात प्रवास केलेल्या इंग्रजी कलाकारांपासून आपण सुरवात करूया... हे कलाकार येथे काय शोधत होते, त्यांचा निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा होता, त्यांना जे सापडले आणि त्यांनी जे अनुभवले ते त्यांनी त्यांच्या चित्रात कसे मांडले, हे जाणून घ्यायचा प्रयत्न आपण ह्या प्रदर्शनाद्वारे करणार आहोत. १९ व्या शतकाच्या मध्यापासून कला जगतात अमुलाग्र बदल जाणवू लागला, कला शाळांमध्ये नवीन पद्धतीचे शिक्षण सुरु झाले, तसेच कलाकारांना नवीन कला साहित्याचा परिचय करून देण्यात आला, यामुळे काही भारतीय कलाकारांना अशाच पद्धतीचा अवलंब करण्यास प्रोत्साहन मिळाले. भारतीय कलाकारांनी आपल्या देशाला पाश्चात्य कलाकारांच्या दृष्टिकोनातून पाहून नव्या शैक्षणिक शैलीमध्ये प्रभुत्व मिळवले. नंतर २० व्या शतकात भारतीय कलाकारांनी अभिव्यक्तीच्या नवीन पद्धतींचा शोध घेतला आणि जणू काही त्यांचे श्रेष्ठत्व आणि त्या शैलीचे प्रतिनिधित्व करण्याचा हक्क पुन्हा मिळवून, भारतीय कलाकारांनी निसर्गचित्र शैलींची एक गौरवशाली श्रेणी शोधून काढली, ज्याचा प्रभाव त्यांच्या कलेमध्ये दिसून येऊ लागला.

सदर प्रदर्शनातील दृष्यकथाही औपनिवेशक शैलीच्या प्रभावी नजरेतून उलगडत जाते. भारतीय कलाकारांनी आत्मसात केलेली, अंगवळणी पडलेली तसेच पुढे पुढे नाकारलेली आणि स्वभूमीत रुजलेल्या प्रतिमांच्या नवीन रूपात उमललेल्या विपुलतेची कथा ह्या प्रदर्शनातून मांडण्यात आली आहे. ह्या शैलीचे स्वातंत्र्य चळवळीच्या वाटचालीशी समांतर आढळणे हा काही योगायोग नाही, त्या त्या काळातील परिस्थिती आणि घटनांवर कलाकारांनी आपल्या कलेतून प्रतिक्रिया देणे स्वाभाविक आहे. निसर्गचित्रकार आपल्या चित्रामंध्ये काळ आणि अवकाश याबाबत सतर्क असतात. कलाकार ज्या भूभागावर वास्तव्य करतात त्या भूमीचे चित्रण करण्याचे नवनवीन मार्ग ते जरी तंत्रावर नियंत्रण मिळवले असले तरी नेहमीच शोधत असतात.

अधिक माहिती   

विभाग खंड
नयनरम्य निसर्गचित्र
इ.स. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रजी नयनरम्यतेचे सौंदर्यविचार विकसित झाले. हा सौंदर्यविचार भारतात रुजवणारे पहिले कलाकार म्हणून ज्यांचा उल्लेख होतो ते म्हणजे थॉमस आणि विल्यम डॅनियल यांच्यासह विल्यम हॉजेस. नयनरम्यतेची ही सौंदर्यव्याख्या अनेक प्रतिभावान नव-कलाकारांच्या कामांत आढळते, ज्यात ईस्ट इंडिया कंपनीचे लष्करी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही समावेश होतो. ही निसर्गचित्रांची एक दूरदृष्टी आहे जी पुरातनतत्व आणि भग्न अवशेषांनाही उठाव देते, आणि इमारतींना वेगळे घटक म्हणून नव्हे तर दृश्यांचा अविभाज्य भाग म्हणून प्रस्तुत करते. वरील सर्व घटक चित्रांत असताना आणि तुरळक लोकांव्यतिरिक्त जीवित अनुपस्थितीमुळे, अतिशय सौंदर्यपूर्ण पण तरीही कोणताही मानवी सहभाग, हेतू नसलेल्या अवकाशाचा आभास निर्माण होतो.

स्वाभाविक निसर्गचित्रं
इ स १८५०च्या दशकात, औपनिवेशीत काळातील वसाहती सरकारने कलकत्ता, मद्रास आणि मुंबई येथे कला विद्यालयांची स्थापना केली, जिथे मसुदे आखणे हा अभ्यासक्रमाचा केंद्रबिंदू होता. ‘बॉम्बे स्कूल’ने विशेषत: पाश्चिमात्य शैक्षणिक दृष्टिकोनाला प्रोत्साहन दिले आणि पहिल्या महान भारतीय कलाकारांना नैसर्गिक शैलीत स्वाभाविक निसर्गचित्रे चितारण्याचे प्रशिक्षण दिले. यामध्ये पेस्टोनजी बोमनजी, म.वि. धुरंधर आणि इतर अनेकांचा समावेश होतो.
कलकत्त्यात, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट अँड क्राफ्टमधील काही पदवीधरांनीही निसर्गवादाचा पुरस्कार केला, जसे की अग्रगण्य प्रिंटमेकर मुकुल डे आणि लघुचित्रं शैली कलाकार बिरेश्वर सेन. नंदलाल बोस यांनी मार्गदर्शन केलेल्या काही कलाकारांनी निसर्गवादाला पसंती दिली आणि इतरांनी त्यांचे अनुकरण केले. काहींसाठी, निसर्गवादी चित्रं हा आयुष्यभराचा ध्यास होता, तर काहींसाठी - जसे कि सुनील दास - ह्यांच्या कलात्मक विकासाचा हा प्रारंभिक टप्पा होता.

मुक्त निसर्गचित्रे
निसर्गचित्रण हा प्रकार प्रस्थापित झाल्यानंतर, काही कलाकारांनी ह्या शैलीतील वास्तववादाच्या आवश्यकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यास सुरुवात केली. निसर्गवाद त्यांना खूप प्रत्यक्ष वाटला आणि शिवाय तो परदेशी शैक्षणिक तत्वांवरही अवलंबून होता. निसर्गचित्राला इतर कोणत्याही विषयाप्रमाणे दृश्य अनुकरण म्हणून नव्हे तर नवीन रूपकात्मक प्रेरणा स्त्रोत म्हणून का मानले जाऊ नये? अंशतः हे कलाकार अभिव्यक्तीवाद आणि अमूर्तवादासारख्या जागतिक घडामोडींना प्रतिसाद देत होते, तेव्हा ते काही प्रमाणात ते प्रयोग करण्याच्या त्यांच्या मूलभूत कलात्मक स्वातंत्र्याला साद देत होते.
सदर विभागातील कलाकार १९०० ते १९४७ दरम्यान जन्मलेले होते, ज्यांनी आपले बालपण आणि यौवन औपनिवेशीत राज्यात व्यतित केले आणि एक स्वतंत्र राष्ट्र घडताना त्यांनी पहिले, त्यांच्या सुरुवातीच्या कलाकृती त्या काळादरम्यानच्या आहेत आणि तोच दुवा पुढे १९८० पर्यंत इथे जोडला आहे. विल्यम हॉजेसच्या आगमनाच्या दोनशे वर्षांनंतर; हॉजेसच्या दृष्टीला ह्या कलाकारांच्या विचारांनी पूर्णपणे बदलून टाकले होते.


Image Gallery