प्रदर्शने

मोफत अभ्यास दौरे

प्रत्येक आठवडाअखेरीस संग्रहालयाच्या
अभिरक्षकांकडून संग्रहालयाची माहिती मिळवा

शनिवार
सकाळी ११.३० वा इंग्रजीतून
दुपारी १२.३० वा मराठी/हिंदी भाषेतून
सर्वांसाठी खुले.

सिद्धपूर: वर्तमान काळ-भूत काळ

द्वारा सेबास्टियन कोर्ते

मार्च २२, २०१५ - जून ७, २०१५

सेबास्टियन कोर्ते ह्यांची सिद्धपूर: वर्तमान काळ भूत काळ ही शृंखला सिद्धपूर नामक फारश्या प्रचलित नसलेल्या गुजरात मधील एका गावातील बोहरा मुसलमान समुदायाचे पहिले-वहिले सखोल छायाचित्रित संशोधन आहे. एका दुसऱ्या कामगिरीवर असताना कोर्तेंना सिद्धपूर सापडले, आणि तिथला संपन्न वारसा आणि प्रादेशिक वास्तुकलेने त्यांना आकर्षित केले. पॉण्डिचेरीवर आधारित त्यांच्या आधीच्या पुस्तकातल्या संकल्पनांना पुढे नेत रचलेलं हे आत्ताचं प्रदर्शन, भारतातील गूढ पैलूंचे दस्तऐवजीकरण करून त्यांना उजागर करण्यातील अविरत कुतुहल दर्शवतं. मोहक आणि पडद्याआड असलेल्या मुसलमान दाऊदी बोहरा समुदायाचे रहस्य, त्यांचा पारंपरिक अधिवास आणि घरांतील अवकाशाची बांधणी छायाचित्रांच्या सखोल अभ्यासातून, आपणासमोर मांडल्याचे दिसते.

परंपरागत व्यवसायाने व्यापारी असलेले बोहरी- बोहरा हे नावच गुजरातमधील 'वेहरू' किंवा व्यापार ह्या शब्दावरून आलंय; ह्या बोहऱ्यांनी आपल्या प्रवासाच्या मार्गांनुसार स्वतःची ओळख सातत्याने, वेळोवेळी नाविन्यपूर्ण रित्या पुनरुज्जीवीत केली. आसपासचे प्रभाव आत्मसात करत, त्यांच्याशी संगनमत करत, त्यांची जी विशिष्ट आणि क्लिष्ट संस्कृती घडली, ती त्यांच्या विलक्षण वास्तुकलेतून दिसून येते; हिंदू, इस्लामी, पर्शियन, युरोपियन आणि वसाहवादी शैलींचा संगमच इथे घडताना दिसतो.

कोर्तेंचा दृष्टीकोन 'वेळ घेऊन लहान कथानकं उलगडून काढणं' आहे. त्याचबरोबर छायाचित्रणासाठी मनाची अनुकुल संयमी स्थिती आणि स्थायी स्वभाव पकडण्याची, उघडकीस आणण्याची आणि दृश्यरूपात स्पष्ट करण्याची क्षमता कोर्ते प्रादेशिक वास्तू-अवकाशाच्या माध्यमातून सातत्याने प्रकाशमान करतात. ह्या मालिकेतील छायाचित्रं अशा घटकांनी ठासून भरलीयेत, अंश जे कधी काळी मौलिक, विलासी आणि अनमोल होते, आणि आज दुर्लक्षित असूनही ते क्षयाला नाकारतात, नामशेष होण्यास विरोध करतात. त्याने छायाचित्रांत उरल्या-सुरल्या आठवणी, इमारतींच्या दर्शनी भागांवर, रिकाम्या खोल्यांमध्ये, खिडकी, दरवाजे, जिने आणि बोहरा वास्तुकलेतील इतर सर्व वैशिष्ट्यांमध्ये चिकटून राहिलेला इतिहास आणि भूतकाळाच्या पाऊल खुणा टिपल्या आहेत. ह्यातून कोर्तेच्या प्रतिमा वर्तमानात असलेल्या भूतकाळाचे संकेत देतात; त्याच्या कामात कायम आढळणारे विषय जसे चरित्र, रूपक आणि भूगोल, संशोधनाची साधनं बनतात.

कोर्ते सांगतात, "बहुतेक घरांतून राहणाऱ्यांचे, घर आणि त्यांतील सामग्रीशी तसे दूरचे नाते भासते...... काहीजणचं मला वास्तुकला आणि त्यावरील बारकाव्यांबद्दल कुठलीही स्पष्ट माहिती वा तपशील देऊ शकले....... त्यांच्या श्रीमंत वारस्याबद्दलचे काही कंगोरे उलगडण्याचे प्रयत्न फक्त परिवारातील महत्वाच्या व्यक्तींची जुनी छायाचित्रं दाखवणे किंवा मी विचारेन तेवढ्यापुरतेच उत्तर देण्याइतपत मर्यादित होते." काही अंशी बघायला गेलं, तर ही मालिका एका संस्कृतीचा हळुवार ऱ्हास आणि तिच्या जतनाच्या समांतर प्रयात्नांवर भाष्य करते, ही 'काळाच्या अवशेषांची' नोंद आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर जीवनशैली आणि फॅशन छायाचित्रकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोर्तेंनी ललित छायाचित्रणाशी सातत्याने ऋणानुबंध जपले आहेत. अमेरिकन नवीन स्थलांतरवादाने, स्टिफन शोर, विल्यम इगलस्टोन आणि फॉक्स टॅलबोट ह्यांच्या छायाचित्रणातून काळाच्या जखमा टिपण्याच्या विशेष क्षमतेच्या अचूक निरीक्षण परंपरेतून कोर्ते प्रेरित आहे. ह्यातूनच त्यांनी कॅमेराची, काळाचे पापुद्रे आणि अवकाशाचे भान टिपण्यासाठीचे, साधन म्हणून वापरण्याची स्वतःची अशी खास शैली विकसित केली आहे. ही शैली प्रत्यक्षपणे येथे प्रदर्शित छायाचित्रांतून दिसते; गमावण्याच्या, नाश आणि क्षयाच्या अनुभूतींचे अनुनाद ऐकू येतात, आणि वर्तमानकाळ आणि भूतकाळ समांतर असल्याच्या जाणिवेतून निरंतर विषाद अनुभवास येतो.



Image Gallery