प्रदर्शने

मोफत अभ्यास दौरे

प्रत्येक आठवडाअखेरीस संग्रहालयाच्या
अभिरक्षकांकडून संग्रहालयाची माहिती मिळवा

शनिवार
सकाळी ११.३० वा इंग्रजीतून
दुपारी १२.३० वा मराठी/हिंदी भाषेतून
सर्वांसाठी खुले.

भारतातील पक्षी

इ. स. १८०० ते १८३५ या कालावधीतील कंपनी चित्रं

नोव्हेंबर २७, २०२१ - एप्रिल १९, २०२२

डॅगच्या सहयोगाने

संकल्पना जाइल्स टिलॉटसन

विशेष प्रकल्प दालन १ आणि २

औपनिवेशिक काळात भारतीय कलाकारांनी पाश्चात्य कलारसिकांसाठी बनवलेल्या कलाकृतींना आज आपण कंपनी चित्रं म्हणून ओळखतो. त्या काळातील जे कलाकार भारतीय राजघराण्याकरिता काम करत असत, त्या कलाकरांनी युरोपियन व्यापारी कंपनी, विशेषतः ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीत विविध क्षमतांमध्ये कार्यरत असलेल्या नवीन ग्राहकांची बाजारपेठ शोधण्यास सुरुवात केली. काही कलारसिकांनी ह्या कलाकारांना आणि त्यांच्या कलेला प्रोत्साहन देण्याकरिता कलेचे साहित्य पुरविले, जसे की युरोपियन निर्मित कागद आणि पारदर्शक जलरंग, आणि चित्रांच्या विविध विषयांवर कलाकारांशी चर्चा करून आपले विचार त्यांच्या पुढे मांडले; ज्यामुळे भारतीय चित्रकलेतील शैली आणि आशय ह्यामध्ये नाविन्यपूर्ण परिवर्तन दिसून येऊ लागले. कंपनी चित्रशैलीत नैसर्गिक इतिहासविषयांना, जसे भारतीय वनस्पती, प्राणी व पक्षी, यांच्या चित्रकलेला विशेष उजाळा मिळाला

सदर प्रदर्शनाचा मुख्य गाभा म्हणजे इसवी सन १८०० च्या सुमारास बंगालमधील अज्ञात कलाकारांनी ज्या विविध पक्षांची ९९ चित्रे काढली ती चित्रे ह्या प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात आली आहेत. दुर्दैवाने ह्या कलाकारांची नावे कुठेही नमूद केलेली आढळून येत नाहीत, तसेच ज्यांनी ह्या अमूल्य चित्रांचे जतन करून ठेवले होते त्यांचीही माहिती उपलब्ध नाही. चित्रांच्या मागील बाजूस असलेल्या आच्छादनाच्या अंतर्गत नोंदीवरून असे आढळून आले की हा ९९ चित्रांचा संग्रह कनिंगहेम ग्रॅहम नावाच्या कुटुंबाने जतन करून ठेवला होता. ह्या चित्रांमध्ये शिकारी पक्षी, पाळीव पक्षी, किनारपट्टवरील पक्षी तसेच जंगलातील पक्षी चितारण्यात आले आहेत. ह्यातील काही पक्षी परिचयाचे आहेत, तर यामध्ये काही दुर्मिळ आणि नष्ट होत चाललेल्या पक्षांच्या प्रजातींचाहि समावेश आहे.

इसवी सन १८१० ते १८३५ दरम्यान रंगविण्यात आलेले तीन लहान संच कनिंगहेम ग्रॅहम यांच्या संग्रहातील चित्रांसोबत ठेवण्यात आले आहेत. यातील ८ संच हे इसवी सन १८१० च्या सुमारास कलकत्ता येथे चितारण्यात आले. ८ चित्रांचा हा संच म्हणजे भारतात काढलेल्या नैसर्गिक इतिहासावरील चित्रांचा उत्कृष्ट नमुना आहे. इ. स. १८३० च्या दरम्यान काढलेली १४ चित्रं ही फेबर यांच्या संग्रहातील आहेत, तर शेवटची ४ चित्रं ही पटणाचे ख्यातनाम कलाकार चुनीलाल ह्यांनी साकारलेली आणि साधारण १८३५ साली काढलेली, इंगे यांच्या संग्रहातील आहेत. हे चार भाग एकत्रितपणे एकाच शैलीत घडलेल्या कंपनीच्या चित्रकलेचा विकास दर्शवतात. ह्या कलाकारांनी केवळ पक्ष्यांचे दृश्य स्वरूपच नाही तर त्यांचे व्यक्तित्वही चितारल्याचे दिसून येते. आम्हाला खात्री आहे की ह्या चित्रांचा आस्वाद केवळ निसर्गप्रेमीच नाही तर कलाप्रेमीही घेऊ शकतील.


Image Gallery