प्रदर्शने

मोफत अभ्यास दौरे

प्रत्येक आठवडाअखेरीस संग्रहालयाच्या
अभिरक्षकांकडून संग्रहालयाची माहिती मिळवा

शनिवार
सकाळी ११.३० वा इंग्रजीतून
दुपारी १२.३० वा मराठी/हिंदी भाषेतून
सर्वांसाठी खुले.

नवरत्नः भारतातील मौल्यवान राष्ट्रीय कलावंत

७ ऑक्टोबर १८ नोव्हेंबर २०१८

१९७० च्या दशकात मांडलेल्या आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या अहवालात, ‘कलात्मक आणि सौंदर्यशास्त्रीय दृष्टिकोनातून कलापरंपरेचा मौल्यवान ठेवा’ म्हणून भारतातील नऊ कलाकारांची नोंद आवर्जुन केल्याचं दिसतं. शतकभराच्या कलासाधनेनंतर, हे कलाकार सर्वांना जोडणाऱया एका धाग्यानं गुंफल्या गेलेल्या विविध कलापरंपरा आणि चळवळींशी असलेलं आपलं नातं मांडतात: अनेकानेक संदर्भांत ह्या कलाकारांची भारताशी जोडली गेलेली नाळ, विषयांची निवड, कथासूत्र आणि त्यांतून निर्माण होणारी ओळख हाच त्यांना जोडणारा धागा.

एकोणिसाव्या शतकादरम्यान कलामहाविद्यालयांतून शिकवल्या जाणाऱया पाश्चिमात्य अभ्यासक्रमात भारतीय कलेचा इतिहास दुर्लक्षिण्यात आल्याचं लक्षात येतं. सदर परिस्थितीला अनुसरुन, कलेचा उज्वल वारसा तसंच पुराणकथांचा अभ्यास करत, कलाकारांनी आपले विषय समाजाला कळतील अशा भाषेत - नव्या धाटणीने मांडायला सुरुवात केली, आणि भारतीय रसिकांच्या मनांत आपली ओळख आणि आत्मीयता निर्माण केली. स्वातंत्र्य चळवळ, आणि स्वातंत्र्य सेनानींच्या छबीचा वापर दृष्यप्रतिमांकनासाठी करण्यात आला; जो संपूर्ण देशाला जोडणारा दुवा ठरला. कलाकारांनी एका मर्यादेपर्यंत समांतर संदर्भ जोडत, तत्कालिन विषयांना हात घातला.

राष्ट्रीय चळवळीच्या नांदीने भूतकाळावरुन प्रेरीत परिचित प्रतिमा मांडल्या जाऊ लागल्या. शिवाय भारतातील ग्रामीण भागांमध्ये पहायला मिळणारी लवचिकता आणि खेडय़ांचा भूप्रदेश - ह्यांचा समावेश चित्रचौकटीत करण्यास कलाकारांनी सुरुवात केली. एका मर्यादेपर्यंत समांतर संदर्भ मांडणारं चित्रंही दिसू लागलं. शोषितांनी व्यापलेल्या ह्या नव्या अवकाशात, स्वातंत्र्य चळवळीचं प्रतिमांकन तसंच विसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळातील भारताची समाजव्यवस्थापकीय घडी आणि आकांक्षा चित्रांकित केल्याचं दिसतं.

हे ऐतिहासिक प्रदर्शन ह्या नऊ कलावंतांच्या नवी क्षितीजं ढुंढाळणाऱ्या कलाकृती मांडतं, सामाईक गुंफण ह्या सगळ्यांना बांधून ठेवते तसंच त्यांतील तफावत त्यांच्यातील वेगळेपणा मांडते.


Image Gallery