प्रत्येक आठवडाअखेरीस संग्रहालयाच्या
अभिरक्षकांकडून संग्रहालयाची माहिती मिळवा
शनिवार
सकाळी ११.३० वा इंग्रजीतून
दुपारी १२.३० वा मराठी/हिंदी भाषेतून
सर्वांसाठी खुले.
२००३ मध्ये संग्रहालय न्यासाची स्थापना झाल्यापासून, संग्रहालयाने आपल्या स्थायी संग्रहाचा विस्तार नवीन कलाकृतींद्वारे करण्यास सुरूवात केली; ज्यात समकालीन कलेसोबतच १९व्या शतकानंतर शहराच्या कला व सांस्कृतिक इतिहासाचे व्यापक प्रतिनिधित्व करणाऱ्या कलाकृतींचा समावेश होतो.
विसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळातील सर ज.जी. कलामहाविद्यालयातील कलाकारांच्या चित्रांचा संग्रह हा विद्यालयाच्या घडणीचा काळ आणि भारतीय आधुनिकतेच्या प्रारंभाबद्दल मौलिक अंतर्दृष्टी देतो. तसंच तो संग्रहालयाच्या पूर्व आधुनिक स्थायी संग्रहाला पूरक ठरतो. ह्या कलाकृती त्या काळातील पुनरुज्जीवनवादी, 'भारतीय प्रबोधन' कला चळवळीचे चित्रण करतात, ज्यात त्या अभिजात भारतीय कलापद्धती, विशेषकरून प्राचीन राजपूत पारंपरिक चित्रशैली पासून प्रेरणा घेतात. रुस्तुम सिसोदिया, केशव फडके, कमलाकांत सावे आणि सुभद्रा आनंदकर ह्यांची चित्रं ह्या संग्रहाचा भाग आहेत.
प्रदर्शनांच्या समृद्ध उपक्रमाअंतर्गत, संग्रहालयातील संग्रह, इतिहास आणि पुराभिलेख यांना प्रतिसाद आविष्कृत करण्यासाठी संग्रहालयाने कलावंतांना आमंत्रित केलं. ह्या प्रदर्शनांतून संग्रहालयाने समकालीन कलाकार शिबा छाछी, अतुल दोडिया, अर्चना हंडे, नलिनी मलानी, जितीश कल्लाट, रीना सैनी कल्लाट, प्राजक्ता पोतनीस, रंजनी शेट्टार, प्रनीत सोई, एल्. एन्. तल्लुर, आणि ठुकराल आणि टागरा ह्यांच्या कलाकृती संपादित केल्या आहेत.
संग्रहालयाच्या समकालीन कला संग्रहाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, Google Arts and Culture वर संग्रहालयाच्या पृष्ठाला भेट द्या.
डॉ. भाऊ दाजी लाड मुंबई
शहर संग्रहालय समाजाच्या सेवेकरिता एक अशी संस्था म्हणून काम करण्याचे उद्देश्य ठेवते जी उत्कृष्ट प्रदर्शनांद्वारे आणि विविध दृक व वैचारिक माध्यमांतून सांस्कृतिक ज्ञानाच्या प्रसाराकरिता समर्पित असेल.
बृहन्मुंबई महानगरपालिकेची संस्था
जमनालाल बजाज प्रतिष्ठानाच्या सहकार्याने कार्यरत
इन्टॅक, इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज द्वारे पुनरुज्जीवीत
पत्ता
वीर माता जिजाबाई भोसले उद्यान (राणीची बाग),
९१/अ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग,
भायखळा पूर्व, मुंबई ४०००२७, महाराष्ट्र, भारत
वेळ:
सकाळी १० - दुपारी ०५.३०
दू. : +९१ २२ २३७४१२३४