अशीर्षकांकित, सुभद्रा आनंदकर
१९५०
कार्डावरील गॉश

स्वात्रंत्योत्तर काळातील सदर चित्राचे प्रमुख वैशिष्ठ्य म्हणजे ह्यात चित्रित केलेला लोकप्रिय भारतीय विधी: बाळाची विधिपूर्वक अंघोळ; समोरच्या बाजूला तेलाने मालिश करताना दर्शवलेले आहे. समोरच्या बाजूस, मध्ये बाळ असलेल्या बायका ह्या चित्राचा विषय असल्याचे लक्षात येते: एक जण बाळाच्या केसांना तेल लावतेय, दुसरी त्याच्या अंगाला मालिश करतेय. हा अतिशय साधारणसा विधी ग्रामीण अंगणात घडतोय असं वाटतं, जिथे इतर बायका त्यांची रोजची कामं किंवा गप्पा गोष्टी करताना दिसतात. बायकांच्या नऊवारी साड्यांचा घोळ तसेच झाडांची पानं अलंकारिक व शैलीबद्ध आहेत, साड्या ग्रामीण जीवन पद्धतीचे द्योतक आहेत. हे चित्र विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सर ज.जी. कलामहाविद्यालयाशी संबंधित ४३ उत्कृष्ट लहान गॉश मध्ये रंगविलेल्या कलासंग्रहाचा भाग आहे. ह्या कलाकृती विद्यालयाच्या घडणीचा काळ आणि भारतीय आधुनिकतेच्या प्रारंभाबद्दल मौलिक अंतर्दृष्टी देतात.