अशीर्षकांकित, अज्ञात
कार्डावरील गॉश

ग्रामीण प्रदेशात गोपाळ आणि त्यांचे गुरं दर्शवणारे हे चित्र संग्रहालयाने २०१२ साली संपादित केले. हे चित्र विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या सर ज.जी. कलामहाविद्यालयाशी संबंधित ४३ उत्कृष्ट लहान गॉश मध्ये रंगविलेल्या कलाकृतींच्या संग्रहाचा भाग आहे. ह्या कलाकृती विद्यालयाच्या घडणीचा काळ आणि आधुनिक भारतीय कलाप्रवाहाच्या प्रारंभाबद्दल मौलिक अंतर्दृष्टी देतात. तसेच त्या संग्रहालयाच्या अलंकारिक वस्तू आणि सर ज. जी. कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या चित्रांच्या स्थायी संचयाला पूरक ठरतात. ह्या कलाकृती त्या काळातील पुनरुज्जीवनवादी, 'भारतीय प्रबोधन' कला चळवळीचे चित्रण करतात, ज्यात अभिजात भारतीय कला पद्धती, विशेषकरून इथे, प्राचीन राजपूत पारंपरिक चित्र शैली पासून प्रेरणा घेतात.