अशीर्षकांकित, सेसिल बर्न्स  
१९१८
कागदावर जलरंग

सेसिल ल. बर्न्स हे सर ज.जी. कलामहाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि संग्रहालयाचे सुरुवातीचे कलाप्रबंधक होते. २०१२ साली हस्तगत केलेले हे चित्र कमळांचे तळे दाखवते आणि त्यांचे जलरंग वापरण्याचे उत्तम कौशल्य प्रदर्शित करते. कदाचित हे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक म्हणून चितारलेले असावे. हे चित्र विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सर ज.जी. कलामहाविद्यालयाशी संबंधित ४३ उत्कृष्ट लहान गॉश मध्ये रंगविलेल्या कलासंग्रहाचा भाग आहे. ह्या कलाकृती विद्यालयाच्या घडणीचा काळ आणि भारतीय आधुनिकतेच्या प्रारंभाबद्दल मौलिक अंतर्दृष्टी देतात.