पडछायांचा मागोवा घेताना
नलिनी मलानी  
२०१४
छापील प्रतिकृती, पाठून रंगविलेल्या

ख्रिस्ता वूल्फ ह्यांच्या कसॅन्ड्राच्या प्राचीन ग्रीक पुराण कथेवर आधारित लेखनापासून पडछायांचा मागोवा घेताना हे नलिनी मलानी आणि रॉबर्ट स्टोर ह्यांचे कलापुस्तक प्रेरित आहे. ह्या बेचाळीस पाठून रंगविलेल्या छापील प्रतिकृती, कसॅन्ड्राच्या पूर्वभासांना दुर्लक्षित करून त्यांना पाखंडी ठरवल्याची कथा सांगतात. समकालीन संदर्भातून ती स्त्रियांच्या क्रांतीच्या अपूर्ण व्यथेचे प्रतीक आहे- की एका स्त्रीचे विचार आणि मतं कशी समजून घेतली जात नाहीत, त्यांना ओळख दिली जात नाही. मलानींच्या ह्या अभिजात कथेच्या चित्तथरारक प्रस्तुतीकरणात प्रत्येक संस्कृतींत आजही स्त्रिया सामोरे जात असलेल्या आव्हानांचे खोल अनुनाद आहेत. कलाकार नलिनी मलानी ह्यांनी पडछायांचा मागोवा घेताना, ४२ छापील प्रतिकृतींची एक प्रत फेब्रुवारी २०१४ मध्ये संग्रहालयाला भेट दिली.