प्रत्येक आठवडाअखेरीस संग्रहालयाच्या
अभिरक्षकांकडून संग्रहालयाची माहिती मिळवा
शनिवार
सकाळी ११.३० वा इंग्रजीतून
दुपारी १२.३० वा मराठी/हिंदी भाषेतून
सर्वांसाठी खुले.
संग्रहालयातील प्रतिकृती आणि देखाव्यांच्या अनन्यसाधारण संग्रहाने एकोणिसाव्या शतकातील मुंबईचे जीवन व संस्कृतीचे दस्तऐवजीकरण करण्यास साहाय्य केले; भारतीयांच्या जीवनाची अतिशय बारकाव्यांनिशी नोंद करण्याच्या वसाहतकालीन प्रकल्पाचा हा एक महत्वाचा भाग होता. संग्रहालयाचे कलाप्रबंधक सेसिल बर्न आणि अर्नेस्ट फर्न, हे दोघेही सर ज. जी. कलामहाविद्यालयाचे अधिष्ठाता होते. त्यांच्या देखरेखीखाली निर्माण झालेला हा संग्रह म्हणजे व्यापक अर्थाने कंपनी शैलीतील चित्रांचा एक विलक्षण कलाऐतिहासिक संदर्भ आहे. अठराव्या ते एकोणिसाव्या शतकांत उदयास आलेल्या मिश्र कलात्मक शैलीला 'कंपनी शैली' म्हंटले जाते. भारतीय जीवनाचे अनेक पैलूंच्या, जसे सण, व्यवसाय, समाजव्यवस्था, स्थानिक राज्यकर्ते आणि स्मारकं इत्यादींच्या, दस्ताऐवजीकरणासाठी वापरण्यात आलेली ही शैली नैसर्गिकतेकडे जाणारी असून त्यावर भारतीय कलेवरिल युरोपचा प्रभाव दिसून येतो.
एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात ब्रिटिशांनी भारतात कला व तांत्रिक प्रशिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांची स्थापना केली. येथे भारतीय कलाकार आणि कारागिरांना पाश्चिमात्य कलाशिक्षण प्रदान केले जात असे. संग्रहालयांशी निकटचे संबंध असलेल्या ह्या संस्थांनी प्रारंभीच्या काळात भारतीय कलाप्रवाहाच्या विकासावर आमुलाग्र परिणाम केला.
मुंबईत १८५६ साली सर जमशेटजी जीजीभाई विद्यालय, जे मुंबई कलाविद्यालय म्हणूनही प्रचलित होते, विद्यार्थ्यांना 'कलेचे शास्त्र', किंवा उत्कृष्ट मसूदेकार होण्यासाठी आवश्यक असलेले तांत्रिक ज्ञान देण्याच्या उद्देशाने सुरु झाले होते. त्याकाळी व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ह्या संग्रहालयाशी कलामहाविद्यालयाचे निकटतम संबंध होते; विद्यालयातील अनेक अधिष्ठाते, संग्रहालयाचे कलाप्रबंधनाचे कार्यदेखील सांभाळत असत. परिणामस्वरुप, संग्रहालय ज. जी. कलामहाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या नव-नवीन रचना, अलंकारिक कलाकृती आणि चित्रं व शिल्पांतील सृजनात्मक निर्मितींचे प्रदर्शनी स्थान बनले. ह्यांतील काही विद्यार्थी पुढे जाऊन मुंबईतले नावाजलेले चित्रकार झाले, जसे राव बहादूर धुरंधर, बाबुराव सडवेलकर आणि प्र. अ. धोंड.
डॉ. भाऊ दाजी लाड मुंबई
शहर संग्रहालय समाजाच्या सेवेकरिता एक अशी संस्था म्हणून काम करण्याचे उद्देश्य ठेवते जी उत्कृष्ट प्रदर्शनांद्वारे आणि विविध दृक व वैचारिक माध्यमांतून सांस्कृतिक ज्ञानाच्या प्रसाराकरिता समर्पित असेल.
बृहन्मुंबई महानगरपालिकेची संस्था
जमनालाल बजाज प्रतिष्ठानाच्या सहकार्याने कार्यरत
इन्टॅक, इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज द्वारे पुनरुज्जीवीत
पत्ता
वीर माता जिजाबाई भोसले उद्यान (राणीची बाग),
९१/अ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग,
भायखळा पूर्व, मुंबई ४०००२७, महाराष्ट्र, भारत
वेळ:
तात्पुरते बंद
दू. : +९१ २२ २३७४१२३४