गारुडी किंवा साप पकडणारा
चार्ल्स डॉयली

सन १८१३  
रंगविलेले आम्ल-जल प्रक्रिया मुद्राचित्र

सौमपरीह नावाचे हे मुद्राचित्र सर चार्ल्स डॉयली ह्यांनी काढलेले असून १८१३ साली प्रसिद्ध झालेल्या 'भारतातील युरोपियन' नावाच्या पुस्तकातील वीस आम्ल-जल प्रक्रिया मुद्राचित्रांपैकी ते एक आहे. ह्या पुस्तकाचा उद्देश्य वाचकाला कंपनीच्या कर्मचाऱ्यांची जीवनशैली उद्बोधक पण गमतीदार भाषेत सांगणे हा होता. ह्या चित्रात भारताची लोकप्रिय प्रतिमा झळकते आणि वाचकाला पूर्व-शाही भारतातील कंपनी अधिकाऱ्याच्या जीवनाबद्दलची अंतर्दृष्टी गवसते. ह्या चित्रात साप पकडणारा किंवा 'गारुडी' आहे जो एकप्रकारचे वाद्य वाजवून युरोपियन लोकांसमोर सापांचे प्रदर्शन करतोय.