रस्त्यावरील दृश्य, मुंबई
बाबुराव सडवेलकर

विसाव्या शतकाचा पूर्वार्ध  
कागदावर जलरंग

बाबुराव सडवेलकर (१९२८-२०००) ह्यांनी सर ज.जी. कला महाविद्यालयात शिक्षण घेतले, जिथे असताना त्यांना युरोपातील दृकप्रत्ययवादी कलाकारांनी खोलवर प्रभावित केले. हा प्रभाव त्यांच्या व्यक्तिचित्र आणि निसर्गचित्रांत प्रामुख्याने आढळतो. हे चित्र मुंबईच्या सर्वात मोठ्या बाजारपेठेजवळच्या अर्थात क्रॉफर्ड मार्केटजवळच्या रस्त्याचे आहे.