मुंबई शैलीतील मातीचा घडा
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत
माती

मुंबई कलामहाविद्यालयात किंवा सर ज.जी. कलामहाविद्यालयात साकारण्यात आलेल्या अनेक सुरुवातीच्या प्रयोगांपैकी एक यशस्वी प्रयोग म्हणजे विविध प्रकारच्या कुंभारकामाच्या उत्पादन प्रक्रियेत केलेल्या सुधारणा. कार्यशाळांमध्ये विविध प्रकारची माती, झिलई, आकार आणि रचनांचे प्रयोग केले जात असत. ह्या झिलई केलेल्या घड्यांवरिल वा फुलदाण्यांवरिल फुलांचे आकार आणि रंग आर्ट नुवो शैलीने प्रभावित झालेले भासतात. त्यांचा आकार अभिजात ग्रीक व रोमन मातीच्या घड्यांसारखा भासतो; ह्या काळात कलामहाविद्यालय नवीन आकार व तंत्रांचे प्रयोग करत होते. मातीचे हे घडे वा फुलदाण्या अनेक आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमध्ये प्रशंसनीय ठरल्या आणि लोकप्रिय झाल्या.