गालिचा, मुंबई कलामहाविद्यालय
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत

फुलांचा आकृतिबंध असलेला सदर गालिचा संग्रहालयाने १९०६ साली पाच गालिच्यांच्या संग्रहाचा भाग म्हणून संपादित केला. ह्याचे उत्पादन सर ज. जी. कलामहाविद्यालयातील (मुंबई कलामहाविद्यालय म्हणूनही प्रचलित) रे कला कार्यशाळेत करण्यात आले होते. रे कला कार्यशाळेची निर्मिती १८९० साली प्रादेशिक कला जसे लाकडी कोरीवकाम, मातीकाम, चांदी व तांब्यातील काम आणि गालिचा विणणे ह्यांना प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आली होती. ह्यांतील काही नमुने, कला महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना, १९१०-११ दरम्यान आयोजित अलाहबाद प्रदर्शनातल्या मुंबई विभागाकरिता उसने देण्यात आले होते.