व्यवसाय
१९१२-१९१४  
अर्धी भाजलेली टेराकोटा माती, रंगद्रव्यांसहित

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत मुंबई शहरातील माणसं, जीवनशैली आणि संस्कृतीचे उत्तम यांचे दस्तऐवजीकरण संग्रहालयातील मातीच्या प्रतिमा आणि देखाव्यांचा संग्रह करतो. १९०० च्या सुरुवातीला संग्रहालयात तयार केलेल्या ह्या मातीच्या प्रतिमा त्याकाळातील विविध व्यवसाय दर्शवतात. तसेच ह्या प्रतिमा अभ्यागतांना मुंबई शहराच्या अर्थव्यवस्थेबद्दल अंतर्दृष्टी देतात. इथे चित्रित केलेले अनेक व्यवसाय आजही शहरात आणि देशभरात कार्यरत आहेत.