न्यायालय
रावबहाद्दूर म. वि. धुरंधर

विसाव्या शतकाचा पूर्वार्ध
कागदावर जलरंग

प्रख्यात चित्रकार महादेव विश्वनाथ धुरंधर १८९० त १८९५ दरम्यान सर ज.जी. कला महाविद्यालयात शिक्षण घेत होते. ते ह्या विद्यालयाचे पहिले भारतीय संचालक (१९१९-१९३५). जलरंगांच्या माध्यमात विशेष प्राविण्य असलेले धुरंधर हे कलाकार आणि ख्यातनाम व्यक्तिचित्रकार झाले. ते चित्रांतील विषय सत्यता आणि भावपूर्णतेने मांडत, ज्यामुळे त्यांच्या चित्रांत समकालीन मुंबईच्या विलक्षण दृक नोंदी आढळतात, ज्या इतर कोणत्याही भारतीय शहराच्या बाबतीत दिसत नाहीत.

१९२८ साली संग्रहालयाने संपादित केलेल्या सदर चित्रात पाश्चिमात्य कला इतिहासातील पारंपरिक नाट्यमय पद्धतीचे न्यायालयातील दृश्य चितारले आहे.