पावसाळ्यातले व्ही. टी. स्थानक
प्र. अ. धोंड

१९५८
कागदावर जलरंग

सर ज. जी. कला महाविद्यालयातील एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंतच्या कलाकारांनी चितारलेल्या चित्रांच्या संग्रहालयातील संचयात प्र. अ. धोंड (१९०८-२००१) ह्यांची जलरंगातील चित्रं लक्षवेधक आहेत. धोंडांचा जन्म व लहानपण जेथे गेले त्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील भूभाग आणि समुद्राच्या प्रेरणेने जी जलरंगातील चित्रं त्यांनी काढली; त्याच पुढे जाऊन त्यांच्या सर्वांत प्रसिद्ध कलाकृती झाल्या.