मुंबई शैलीतील मातीचे भांडे
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत  
माती

मुंबई कलामहाविद्यालय किंवा सर ज.जी. कला महाविद्यालयात करण्यात आलेल्या अनेक सुरुवातीच्या प्रयोगांपैकी एक यशस्वी प्रयोग म्हणजे विविध प्रकारच्या कुंभारकामाच्या उत्पादन प्रक्रियेतील सुधारणा. सर ज.जी. कला महाविद्यालयातील जाॅर्ज सी. क्लार्क कार्यशाळेत मातकामाच्या अनेक प्रयोगांतून अनेक रंग आणि आकारांची निर्मिती झाली, जे पुढे युरोप आणि भारतात लोकप्रिय ठरले. मुंबई शैलीतील मातकामात पांढरा, निळा व मोरपंखी, गडद निळा, गडद हिरवा, सोनेरी आणि बदामी रंग विशेष लोकप्रिय होते. नारंगी झिलईची आणि निमुळत्या मानेची ही फुलदाणी ह्या काळातील सर ज.जी. कलामहाविद्यालातील विद्यार्थ्यांच्या निर्मितीचे एक उदाहरण आहे. ही अशी मातीची भांडी पाश्चिमात्य बाजारांत आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमध्ये अतिशय लोकप्रिय होती.