ग्राम तांत्रिक शाळा
सन १९५७
रंगविलेली अर्धी भाजलेली माती आणि कागदाचा लगदा वापरून केलेला देखावा

लोकांमध्ये उत्तम कलेची जाणीव वृद्धिंगत करण्यासाठी बॉम्बे, कलकत्ता आणि मद्रास (चेन्नई) ह्या इंग्रजांनी वसवलेल्या शहरांत, तसेच जयपूर आणि लखनौ सारख्या महत्वाच्या शहरांत तांत्रिक शाळा उभारण्यात आल्या. सुरुवातीच्या दिवसांत ह्या शाळांमध्ये नृत्य आणि संगीत ते सुतारकाम आणि मतकामापर्यंत सर्व काही शिकवले जायचे, चित्र आणि रंगकामासारखे तांत्रिक कौशल्य ही त्यांत समाविष्ट होते.

विसाव्या शतकाच्या मध्यात तयार केलेला सदर देखावा तांत्रिक शाळेचा आहे. ह्यात वर्ग, संग्रहालयाची खोली, साधनगृह आणि कार्यशाळा असलेल्या शाळेची इमारत आहे. इथे विद्यार्थी विणकाम, सुतारकाम, दोरी बनवताना, मशागत, शोभेचे बागकाम, संगीत, नृत्य आणि विविध हस्तकला इत्यादी विषय शिकताना चित्रित केले आहेत.