मराठा स्त्री
राव बहाद्दूर म. वि. धुरंधर

सन १९१६ 
कागदावर जलरंग

प्रख्यात चित्रकार महादेव विश्वनाथ धुरंधर हे १८९० ते १८९५ दरम्यान सर ज.जी. कला महाविद्यालयात शिक्षण घेत होते. ते ह्या विद्यालयाचे पहिले भारतीय संचालक (१९१९-१९३५). जलरंगांच्या माध्यमात विशेष प्राविण्य असलेले धुरंधर हे कलाकार आणि ख्यातनाम व्यक्तिचित्रकार झाले. ते चित्रांतील विषय सत्यता आणि भावपूर्णतेने मांडत, ज्यामुळे त्यांच्या चित्रांत समकालीन मुंबईच्या विलक्षण दृक नोंदी आढळतात, ज्या इतर कोणत्याही भारतीय शहराच्या बाबतीत दिसत नाहीत.

१९१६ साली संग्रहालयाने संपादित केलेल्या ह्या चित्रात मराठा समुदायातील स्त्री तिच्या पारंपरिक साजात दाखवलेली आहे.