चांभार, पटणा
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत
रंगविलेले अभ्रक

संग्रहालयातील अभ्रकावर रंगविलेल्या चित्रांचा संग्रह पारंपरिक भारतीय जीवनशैली आणि विविध व्यवसायांमध्ये व्यस्त लोकांचं दर्शन घडवतो, जसा इथे चांभार दाखवला आहे. अभ्रकाच्या तावाचा पृष्ठभाग गुळगुळीत, चकचकीत आणि लकाकी असणारा असतो. पटणा शैलीतील ही चित्रं पोस्ट कार्ड आकाराच्या अभ्रकाच्या तावावर काढलेली असून, त्यावर सूक्ष्म कुंचल्याने चिकट मिश्रणातल्या रंगानी लेपन केलेले आहे. भारतात येणाऱ्या युरोपियन अभ्यागतांमध्ये ही अभ्रकावर रंगविलेली चित्रं बरीच लोकप्रिय होती, स्मृतिचिन्ह म्हणूनही ही घेतली जात असत.