हिंदू नर्तिका
सन १८९९
रंगीत छाप

'हिंदू नर्तिका' नावाची ही छापील प्रत एफ्. एम्. कोलमन् संपादित प्रकाशन, 'भारतीय रहिवास्यांची वैशिष्टपूर्ण चित्रं' मध्ये १८९७ साली प्रकाशित झाली होती. ह्या पुस्तकात विविध जाती व व्यवसाय असलेल्या भारतीयांच्या वेशभूषा, हाताने रंगविलेल्या छायाचित्रांच्या संचयात आढळतात. अशा व्यक्तिचित्रांमुळे एक प्रकारच्या लोकप्रिय चित्रांना सुरुवात झाली, जी पोस्ट कार्डांवर छापली जाऊ लागली; युरोपियन पर्यटक त्यांच्या भारताच्या सफरीदरम्यान ही चित्रं आवर्जून विकत घेत असत.

हाताने रंगविलेल्या सदर छायाचित्रात हिंदू नर्तिका चित्रित केलेल्या आहेत. समाजातील प्रतिष्ठित उच्चभ्रू वर्ग अश्या नृत्याच्या कार्यंक्रमांचे आयोजन करत असे, आणि कंपनीचे मोठ्या हुद्दाचे अधिकारी ह्या कार्यक्रमांना आमंत्रित केले जात असत.