दिवान-ए-खास, दिल्लीचा किल्ला
विसाव्या शतकाचा पूर्वार्ध
उत्थित नकाशा

दिल्लीच्या किल्ल्याचे हे हस्तिदंतावरील चित्र य. ह. शरीफ हुसेन खान नामक कलाकाराने चितारलेले आहे. संग्रहालयाने १९२९ साली हे संपादित केले. मुघल सम्राटांचा दरबारी आणि राजकीय अतिथींना भेटण्यासाठीचा खाजगी दिवाणखाना म्हणजे दिवान-ए-खास.

हस्तिदंतावर रंगविलेली लघुचित्रं हा भारतीय उपखंडातील एक लोकप्रिय कलाप्रकार होता. हस्तिदंतावर पातळ अर्धपारदर्शक रंगद्रव्य टिकून राहावे म्हणून करकरीत आणि वंगण-विरहित केले जात. संग्रहालयाचे सुरुवातीचे कलाप्रबंधक, जाॅर्ज बर्डवुड, ह्यांनी नोंद केली आहे की हस्तिदंतावरील चित्रं भारतीय आणि युरोपातील उच्चभ्रू लोकांमध्ये अतिशय प्रतिष्ठेची मानली जात असत.