जोधाबाई
विसाव्या शतकाचा पूर्वार्ध
रंगविलेला हस्तिदंत

हस्तिदंतावर रंगविलेली लघुचित्रं हा भारतीय उपखंडातील लोकप्रिय कलाप्रकार होता. हस्तिदंताचे पातळ अर्धपारदर्शक ताव रंग टिकून राहावे म्हणून करकरीत आणि वंगण-विरहित केले जात. मग त्याला सूर्यप्रकाशात ठेऊन अधिक पांढरे करत आणि रंगांना बांधून ठेवणारे द्रव मिसळून रंग अधिक चिकट केले जात असत. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात हस्तिदंतावरील लघुचित्रांच्या रूप-रचनांमध्ये युरोपियन प्रभाव दिसू लागला, जसे मुघल सम्राट अकबरची राणी, सम्राज्ञी जोधाबाईचे हे प्रतिमांकन, जे राजपूत शैलीतले आहे. संग्रहालयाचे सुरुवातीचे कलाप्रबंधक, जाॅर्ज बर्डवुड, ह्यांनी नोंदवले आहे की हस्तिदंतावरील चित्रांना भारतीय तसंच युरोपातील उच्चभ्रू लोकांमध्ये अतिशय प्रतिष्ठेचं स्थान होतं.