ग्रामीण जीवन (तपशील)
विसाव्या शतकाचा प्रारंभ  
उत्थित नकाशा

एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकांतील मुंबईची जीवनशैली आणि सांस्कृतिक घडीचे दस्ताऐवजीकरण करण्यासाठी बनवलेल्या ह्या प्रतिमा आणि देखावे असून ते समकालीन कला, ऐतिहासिक घडामोडी आणि नव्या कलाकृतींच्या निर्मितीसाठी केलेले नवे प्रयोग मांडतात. १९३५-३६ दरम्यान साकारलेला हा देखावा एका ग्रामीण भारतीय गावाचा आहे; ज्यात वास्तविक परिस्थिती आणि ग्रामीण जीवन, तसंच शेतीचे भारतीय 'आदर्श' - जे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटिशांनी कल्पिले आणि नियोजित केले, त्यांची मांडणी केल्याचं दिसतं. त्या काळातील चित्रपट व छायाफितीचा अभाव बघता संग्रहालय हेच लोकांपर्यंत पोहोचण्याचे एक महत्वपूर्ण माध्यम होते. अशा पद्धतीचे देखावे विविध आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांत प्रदर्शित केले जात असत.