शीर्षकहिन (कोळ्याचे जाळे/ अडथळे)
रीना कल्लाट
एफ्.आर्.पी. आणि धातूचे रंगविलेले मांडणी शिल्प

रीना कल्लाट ह्यांचे शीर्षकहिन (कोळ्याचे जाळे/ अडथळे) हे शेकडो रबरी शिक्क्यांचे एक अतिभव्य जाळे आहे. प्रत्येक रबरी शिक्क्यावर वसाहतकाळातील शहरातल्या रस्त्याचे नाव आहे, जे आजच्या मुंबई शहरात स्वदेशी नाव देऊन पुनःश नामांकित करण्यात आले आहे. ब्रिटिश काळात इंग्रजी नावांच्या रस्त्यांना भारतीय वा प्रादेशिक नावं देणे, ह्या वसाहतवादी चौकटीतून बाहेर येण्याच्या प्रक्रियेच्या एका पैलूची आठवण जागृत करून, एक लहर निर्माण होते - ज्यावर पिढ्यान् पिढ्या पुन्हा पुन्हा कथा कोरल्या जातात. ही कलाकृती राळेचे रबरी शिक्के, पोलादी दोरखंड, पोलादी आकडे ह्यांचे बनले असून ४५ फूट उंच आणि ६० फूट रुंद आहे.

शीर्षकहिन (कोळ्याचे जाळे/ अडथळे) हे काम एरमेनेजिलदो झेन्या समूह आणि डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय ह्यांच्यात झालेल्या सहयोगी प्रकल्प 'झेन्या कला सार्वजनिक/ भारत' चा भाग आहे. हे मांडणी शिल्प संग्रहालयाकरिता बनविण्यात आले आणि मार्च २०१३ मध्ये सर्वांसाठी खुले करण्यात आले.