पी.ओ.आय./ भारतातील लोक
अर्चना हंडे  
२०१४
  चित्रफीत, ध्वनी, माती, प्लास्टरच्या प्रतिकृती, मच्छरदाणी

पी.ओ.आय./ भारतातील लोक हे कलाकार अर्चना हंडे ह्यांचे अनेक-माध्यमांत घडवलेले मांडणी शिल्प आहे, ज्यात १२फूट उंचीची छापील मच्छरदाणी, ४५ मिनिटे आणि ५ मिनिटांच्या २ चित्रफिती आणि एक ध्वनिफीत, यांचा समावेश आहे. हंडे ह्यांनी मच्छरदाणीचं रुपक हे ब्रिटिशांकडून आलेल्या आणि भारतात सर्वत्र वापरल्या जाणाऱ्या एका संरक्षणात्मक पडद्यांच्या परिमाण म्हणून वापरल्याचं दिसतं, ही मच्छरदाणी संग्रहालयाच्या संचयातून आणि त्यांच्या वैयक्तिक संग्रहातून मिळवलेल्या शेकडो लोकांच्या क्षणिक प्रतिमांना आवरण घालते. हंडेंनी समकालीन आणि ऐतिहासिक प्रतिमांची एक भूरचना निर्माण केलेले दिसते जी भुतांसारखी अवतरते आणि आच्छादन, जे खरं म्हणजे मच्छरदाणी आहे, त्यात गायब होते; भूतकाळातील हरवलेले क्षण जे आज आणि आत्ताच्या क्षणात स्वरूप धारण करून वास्तव्य करण्याच्या प्रयत्नात आहेत. चित्रफीत, स्थापत्य, लोकप्रिय प्रतिमा आणि ध्वनीचा वापर करून कलाकाराने हरवून टाकणारा अनुभव निर्माण केलाय, ज्यात प्रेक्षकांना आपण कोण आहोत आणि आपण स्वतःकडे कसे बघतोय ह्यावर विचार करण्यास ती प्रवृत्त करतेय.

अर्चना हंडे ह्यांचे पी.ओ.आय./ भारतातील लोक संग्रहालयाकरिता २०१४ साली बनविण्यात आले आणि ऑक्टोबर २०१४ मध्ये सर्वांसाठी खुले करण्यात आले.